सुधारित आदेश न झाल्यास संप कालावधीत सात दिवसाचे वेतन विनावेतन म्हणून माहे एप्रिलच्या वेतनातून.. जिल्हा कोषागार अधिकारी

सुधारित आदेश न झाल्यास संप कालावधीत सात दिवसाचे वेतन विनावेतन म्हणून माहे एप्रिलच्या वेतनातून कपात करण्यात येईल..

 जिल्हा कोषागार अधिकारी.. 


 परिपत्रक


दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या संप कालावधीतील 07 दिवसांचा कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक- संघटना 1522/ प्र.क्र.36/ 16-अ दिनांक 28 मार्च 2023 नुसार संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले हाते, त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी. असे नमूद केलेले आहे.


सदर माहे मार्च 2023 चे वेतन अदा करणेबाबत संप कालावधीतील 07 दिवसांचे संपामध्ये सहभागी कर्मचारी यांचे बाबत पूर्णत वेतन अदा करण्यात येत असून उपरोक्त नमूद दि. 28 मार्च 2023 चे शासन निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित शासन आदेश निर्गमित न झाल्यास सदर संप कालावधीतील 07 दिवसांचे वेतन हे विना वेतन म्हणून माहे एप्रिल 2023 च्या वेतनातून एकरकमी कपात करण्यात येईल. याची कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी नोंद घेऊन सदर परिपत्रकामध्ये नमूद कार्यवाही बाबत (एकरकमी कपात करण्यास हरकत नाही) मी व्यक्तिश: सहमत आहे असे नमूद करावे.



जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर


वरील प्रमाणे संबंधित कर्मचाऱ्याकडून लिहून घेऊन मार्च महिन्याचे पूर्ण वेतन अदा करण्यात येणार आहे.






नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments