विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत ग्रामविकास विभागाचा दिनांक 11 एप्रिल 2023 चा आदेश

 विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत ग्रामविकास विभागाचा दिनांक 11 एप्रिल 2023 चा आदेश. 


सदर आदेशानुसार विभागीय आयुक्त सर्व व जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाने विस्ताराधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदान संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रिय स्तरावरील विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख ही पदे महत्वाची असून राज्यामध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.


या विभागाच्या दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार आपल्या अधिपत्याखालील विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवरील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदरची पदे भरण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये निर्देश दिलेले होते. तथापि, प्रस्तुत प्रकरणी केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास काहीच अवगत करण्यात आलेले नाही.


तरी उक्त नमूद दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी-२) व विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी-३) संवर्गातील तालुकानिहाय मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील est14-rdd@mah.gov.in या ई-मेल वर दिनांक १०.४. २०२३ पर्यंत पाठविण्यात यावा, ही विनंती.


मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना विनंती करण्यात येते की, विषयांकित प्रकरणी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे तात्काळ माहिती उपलब्ध करुन द्यावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.