राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण 2023 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे पत्र.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या दिनांक 21 मार्च 2023 च्या परिपत्रकानुसार राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण 2022-23 च्या आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील इयत्ता तिसरी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण SLAS चे आयोजन दिनांक 17 मार्च 2023 रोजी करण्याबाबत कळवण्यात आलेली होते.
मात्र सदर सर्वेक्षण हे जुनी पेन्शन योजनेबाबत शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विमुदत संपामुळे दिनांक 17 मार्च 2023 रोजी घेण्याबाबत कळविण्यात आलेले होते मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दिनांक 30 मार्च रोजी मिटला त्यामुळे राज्यस्तरीय अध्ययन संपादनक सर्वेक्षणाचे आयोजन दिनांक 24 मार्च 2023 रोजी करण्यात आलेले आहे.
सर्वेक्षण पूर्वतयारी म्हणून दिनांक 23 मार्च 2023 रोजी क्षेत्रीय अन्वेषक यांच्या ताब्यात सर्वेक्षण साहित्य द्यावे दिनांक 24 मार्च 2023 रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे बाबत सूचना द्याव्यात सर्वेक्षणाच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी तालुका स्तरावर सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे जिल्हास्तरावर दिनांक 26 मार्च 2023 रोजी सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे.
दिनांक 27 किंवा 28 मार्च 2023 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे जिल्हा समन्वयक यांचे मार्फत इयत्ता निहाय व शाळा निहाय वापरण्यात आलेल्या ओ एम आर शीट ची पाकिटे जमा करणे बाबत अवगत करण्यात यावे.
SLAS प्रश्नपत्रिका व न वापरलेल्या ओ एम आर शीट डायट स्तरावर जपून ठेवाव्यात इयत्ता निहाय व शाळा निहाय वापरण्यात आलेल्या ओ एम आर शीट ची पाकिटे आणण्याचा वाहतूक खर्च व जिल्हा समन्वय यांचा राज्यस्तरावर साहित्य पोहोचण्यासाठीचा टी ए व डी ए हा कार्यालयीन खर्चातून काढण्यात यावा.
दिनांक 24 मार्च 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण बाबत जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक क्षेत्रीय अन्वेषक संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत सूचित करण्यात यावे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे सर्वेक्षण पूर्ण होतात जिल्हा समन्वयक यांचे मार्फत दिनांक 28 मार्च 2023 रोजी विहित नमुन्यातील मूळ उपयोगिता प्रमाणपत्र व खर्च अहवाल परिषदेस विना विलंब सादर करण्यात यावा.
वरील प्रमाणे सूचना व निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी संबंधितांना दिले आहेत.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments