शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवाजेष्ठते संदर्भात सुधारित अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन.

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवाजेष्ठते संदर्भात सुधारित अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे पुढील प्रमाणे अधिसूचना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता ठरविण्यासाठी निर्गमित केली आहे.


महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 याच्या कलम 16 ची पोट कलमी एक व दोन याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्यास समर्थक करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे हे नियमक्त अधिनियमाच्या कलम 16 च्या पोट कलम तीन द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या नियमास महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2023 असे म्हणावे.

महाराष्ट्र खाजगी शाळा मधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूची फ च्या परीक्षेत दोन एक प्रवर्ग क ऐवजी पुढील प्रमाणे दाखल करण्यात येईल. 

प्रवर्ग पुढील अहर्ता धारण करणारे. . 

सामाजिक शास्त्र मानवी शास्त्र गणित विज्ञान भाषा 50% गुणासह विषयातील पदव्युत्तर पदवी आणि एम एड 50% गुणासह किंवा एम ए शिक्षण शास्त्र 50% गुणासह राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे वेळोवेळी केला जाणाऱ्या बदलासह. . 

किंवा

एम ए एम एस सी एम कॉम बी टी बी एड किंवा तत्सम;

किंवा

बीए बीएससी बीकॉम बी टी बी एड किंवा तत्सम;

किंवा

बी ए/बी एस सी/बी कॉम/डीप टी दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम किंवा डीएड दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम;

किंवा

बी ए/बी एस सी/बी कॉम, एस टी सी डिपेंड डीपी एका वर्षाचा पाठ्यक्रम इत्यादी झाल्यानंतर व दहा वर्षाच्या सेवेनंतर. 

किंवा

बीए किंवा सम कक्ष यासोबत पाच वर्षाच्या अनुभवानंतर वरिष्ठ हिंदी शिक्षक सनद किंवा दहा वर्षाच्या अनुभवानंतर कनिष्ठ हिंदी शिक्षक सनद;

किंवा

क्रीडा शिक्षकांसाठी 250 विद्यार्थ्यांसाठी एक शारीरिक शिक्षक व शारीरिक शिक्षण या विषयाचा किमान 50% कार्यभार या अटीची पूर्तता होत असलेल्या प्रकरणी बीए बीएस्सी बीकॉम एचडी बीएड शारीरिक शिक्षण;

किंवा

कला शिक्षकांसाठी

बी ए बी एस सी बी कॉम बी एफ ए जी डी आर पदविका डीटीसी इत्यादी झाल्यानंतर दहा वर्षाच्या सेवेनंतर. 


२) टीप एक च्या ऐवजी पुढील प्रमाणे दाखल करण्यात येईल:-

अ) आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक आहारता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी ही प्रवर्गानुसार ठेवण्यात येईल. 

ब) प्रवर्ग क ड अथवा इ मध्ये समावेश होण्यासाठी नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकांनी त्याच्या प्रवर्गाकरिता प्रकरण परत्वे उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक असलेली अहर्ता धारण करणे आवश्यक असेल. त्या प्रवर्गातील त्याची सेवा जेष्ठता संबंधित प्रवर्गात समाविष्ट झाल्याच्या तारखेपासून विचारात घेण्यात येईल. 

क) प्रवर्ग किंवा ह मध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या शिक्षकांनी सेवेत असताना प्रकरण परत्वे प्रवर्ग क ड किंवा ई प्रवर्गात अंतर्भूत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांसाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास संबंधित शिक्षकांचा समावेश त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थानुसार प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेल्या संबंधित प्रवर्गात करण्यात येईल. तथापि त्या शिक्षकांची संबंधित प्रवर्गातील सेवाजेष्ठता ही त्याच्या नियुक्ती दिनांक विचारात न घेता त्याने आवश्यक अहर्ता धारण केल्याच्या दिनांक पासून विचारात घेण्यात येईल व संबंधित प्रवर्गात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकानंतर त्याचा सेवाजेष्ठता क्रम निश्चित करण्यात येईल. 

ड) एखाद्या प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षकांनी उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अहरता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असेल तथापि माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवा जेष्ठतेच्या सूचीमध्ये जेष्ठतेचा दावा करू शकणार नाही त्याचा उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाईल. 


सदर अधिसूचना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने जारी करण्यात आलेली आहे. 


वरील संपूर्ण सुधारित अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.