शिक्षण सेवक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व शाळेतील इतर कर्मचारी यांचे मानधनात वाढ करणे बाबत आजचे शासन निर्णय

 शिक्षण सेवक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व शाळेतील इतर कर्मचारी यांचे मानधनात वाढ करणे बाबत आजचे शासन निर्णय.


1

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षण सेवक यांचे मानधनात वाढ करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


सदर शासन निर्णयानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवक यांचे मानधनात वाढ करण्यात येऊन त्यांचे मानधन आता सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.


माध्यमिक स्तरावरील शिक्षण सेवक यांना त्यांचे मानधन आठ हजार रुपयांवरून वाढवून 18 हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.

तर उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवक यांना 9000 रुपये वरून मानधनात वाढ करून त्यांचे मानधन आता वीस हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.


वरील मानधनातील वाढ ही दिनांक एक जानेवारी 2023 पासून लागू असणार आहे.


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दुसऱ्या दिनांक 7 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव मानधन लागू करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


शाळांमधील कनिष्ठ लिपिकांचे मानधन या अगोदर दोन हजार रुपये एवढे होते ते वाढवून आता दहा हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.

ग्रंथपाल यांचे मानधन यापूर्वी 2500 रुपये एवढे होते ते आता वाढवून 14 हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक यांचे यापूर्वी असलेले 2500 रुपये एवढे मानधन वाढवून आता ते बारा हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.

तर चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचे पूर्वीचे असलेले 1700 रुपये मानधन वाढवून आता ते आठ हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.


सदर मानधन वाढ देखील दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू असणार आहे.


वरील शासन आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.