बदली अपडेट जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचा ग्रामविकास विभागाचा आदेश!

बदली अपडेट जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचा ग्रामविकास विभागाचा आदेश! 


आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 23 जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


ग्रामीण विकास विभागाच्या दिनांक सात एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णय आणि सार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या या संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सद्यस्थितीत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची कार्यवाही शासन पत्र दिनांक 20 डिसेंबर २०२२ व दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी च्या वेळापत्रकानुसार सुरू असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक एक दोन तीन चार व पाच मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.


शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2019 मधील मुद्दा क्रमांक 4.3.4 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या करताना पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असतील तर एकत्रिकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र भरण्यात येईल. असे नमूद आहे तथापि महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 नियम 9.56 मधील विहित बदली व्याख्येस अनुसरून ज्या पती-पत्नीची टप्पा क्रमांक पाच मध्ये वन युनिट म्हणून बदली झालेली आहे तथापि त्यापैकी एकाच्या शाळेत मध्ये बदल झालेला नाही त्याच शाळेतील अन्य रिक्त बदलीपात्र पदावर बदली झालेली आहे अशा शिक्षकांचा त्या शाळेवरील वास्तव सेवा जेष्ठतेचा दिनांक हा त्याच शाळेवरील प्रथम रुजू झाल्याचा दिनांकच ग्राह्य धरण्यात यावा तथा ती अशा शिक्षकांना सन 2022 23 च्या बदली प्रक्रियेमधील टप्पा क्रमांक पाच च्या पुढील बदली प्रक्रियेमधून वगळण्यात यावे.


विन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक पाच राबवतांना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे सदर तांत्रिक बाबींवर कार्यवाही करून दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. सदर यादी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून ती यादी तसेच बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यानंतर जिल्हा स्तरावरील रिक्त जागांची यादी व टप्पा क्रमांक सहा करिता पात्र विस्थापित शिक्षकांची यादी आज प्रसिद्ध करण्यात यावी अशी सूचना वजा विनंती सदर शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.




वरील ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.