राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दिवाळी बोनस दिले जात होते. त्यानंतर बोनस देणे बंद करून अग्रीम रक्कम देण्यात येत होती. मात्र गत वर्षापासून दिवाळी सण अग्रीमविनाच साजरा करावा लागत आहे. सण अग्रीम दरवर्षी देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
दिवाळी सणासाठी दिली जाणारी अग्रिम रक्कम बिनव्याजी दरमहा वेतनातून दहा महिन्यात १२५० रूपये प्रमाणे शिक्षकांकडून वसूल करून शासनाच्या नियमानुसार शासनाच्या खाती जमा करण्यात येत होती. परंतु, मागील वर्षापासून दिवाळीसाठी मिळणारी सण अग्रीम रक्कमही देणे शासनाने बंद केले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या नियमित वेतनावरच दिवाळी सण साजरा करावा लागत आहे. हा सण महत्त्वाचा असून आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी केले. परंतु, अग्रीमसाठीच्या रकमेची तरतूदच केली नसल्याने शिक्षकांना अग्रीमपासून वंचित रहावे लागत आहे. शिक्षकांना दिवाळी सण अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाच्या वतीने करण्यात आली होती. परंतु, शासनस्तरावरून आर्थिक तरतूदच उपलब्ध नसल्याने दिवाळीसाठी सण अग्रीम देणे शक्य नाही, असे शिक्षण विभागाच्या वतीने संघटनेला सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी सांगितले. अग्रीम रक्कम दिवाळी सणाला देता आली नाही तर डिसेंबर महिन्यात येणाऱ्या किंवा इतर सणाला सणाला सण अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.
वरिष्ठ कोषागार अधिकारी संभाजीनगर यांच्या प्रेस नोट नुसार दिवाळी सण अग्रीम व वेतनाबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहे.
प्रेसनोट
आज दिनांक 22.10.2024 रोजीचे मा. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 23.10.2024 व 24.10.2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होईल. दिनांक 26.10.2024 ते 29.10.2024 या कालावधी दरम्यान कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे. करीता नमुद दिनांकादरम्यान कोणतेही देयक कोषागारात स्विकारले जाणार नाही. त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.
(शेखर कुलकर्णी)
उपसंचालक तथा वरिष्ठ
कोषागार अधिकारी,
छत्रपती संभाजीनगर.
शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवलेल्या परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर सण अग्रीम वितरित करणे बाबत पुढील प्रमाणे विनंती केली आहे.
संदर्भ :-१. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अग्रिम २०१८/प्र.क्र.३७/१८/विनियम, दिनांक २३.१०.२०१८
२. परिपत्रक क्रमांक २०१८७/क-३ (लेखा), दिनांक २८ सप्टेंबर २०२१
३. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्रार्यामक शिक्षक संघ, आदर्श बहुजन शिक्षक संघ.म.रा. या संघटनांचे दिनांक १५.१०.२०२४ ची निवेदने.
महोदया,
उपरोक्त विषयी सविनय सादर करण्यात येते को, लेखाशिर्ष २२०२०१७३-३६, २२०२००४८-३६, २२०२०१८२-३६, य २२०२३७०८-३६, या लेखाशिर्षाअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सण अग्रीम वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नाहीत. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची साप्ण अग्रोम मिळणेबाबत वारंवार मागणी होत आहे.
सण अग्रीम अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावर पुरेसे अनुदान उपलब्ध नाही. तरी सण अग्रीम द्यावयाचे झाल्यास खालील प्रमाणे अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे
उपरोक्त प्रमाणे रकाना क. ३ मधील सण अग्रीमसाठीची मागणी करण्यात येत असून उपरोक्त निधी उपलब्ध करुन देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना सण अग्रीम अदा करणेबाबत कृपया आदेश व्हावेत ही विनंती.
आपला विश्वासु,
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रत: माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त, आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम चे अनुदान वाटप करणे बाबत जिल्हा परिषद जळगाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत लेखाशीर्ष 20530565 (36) खालील जि.प स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील वर्ग-3 चे कर्मचारी व वर्ग-4 (कार्यालयीन आस्थापना) तसेच पंचायत समिती स्तरावरील ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी (ग्राम पंचायत अस्थापना) यांचे करीता दरवर्षी दिवाळी ह्या सणानिमित्त अग्रीमाचे वाटप प्रत्येकी कर्मचारी निहाय (ऐच्छिक नुसार) मंजूर अनुदान रक्कम रु. 12500/- प्रमाणे (अक्षरी रक्कम रु. बारा हजार पाचशे मात्र) वाटप करण्यात येते.
त्याप्रमाणे गेल्या वर्षी सन 2023-24 ह्या आर्थिक वर्षात लेखाशीर्ष 20530565 (36) खाली आपल्या
कार्यालयातील ऐच्छिक असलेले कर्मचारी (वर्ग-3 व वर्ग-4) तसेच ह्या लेखाशिर्षांतर्गत येत असलेले वेतन धारक ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी यांना देखील दिनांक:- 08/11/2023 करण्यात आलेले होते. तरी असे निदर्शनास आले आहे की आपल्या कार्यालयातील काही ऐच्छिक असलेले वर्ग 3 व वर्ग-4 चे कर्मचारी तसेच ग्राम पंचायतीतील ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी यांचे दिवाळी सणानिमित्त करण्यात आलेली अनुदान मागणी पत्र हे वेळीच ह्या विभागास सादर झाले नाही परिणामी ते उशिराने प्राप्त झाल्या कारणाने व अनुदान अभावी अशा वर्ग 3, वर्ग-4 कर्मचारी तसेच ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी यांस दिवाळी सणाग्रीमाचे अनुदान ऐनवेळी वितरीत करता आले नाही.
आता चालू वर्ष सन 2024-25 ह्या आर्थिक वर्षात देखील ह्या विभागांतर्गत लेखाशीर्ष 20530565(36) खालील जि.प स्तरावरील संबंधित कर्मचारी जे इच्छुक आहेत असे कर्मचारी (वर्ग-3 व वर्ग 4) तसेच पं. स स्तरावरील ग्राम सेवक ग्राम विस्तार अधिकारी जे इच्छुक आहेत असे कर्मचारी च्या प्रत्येकी संख्ये निहायच गुणिले सण अग्रीम मंजूर अनुदान रक्कम 12500/- प्रमाणे एकूण आवश्यक तेवढीच लागणारी रक्कम ही आपल्या कार्यालयीन कर्मचारी यांच्या कार्यालयीन आस्थापना व ग्राम पंचायत आस्थापना तक्ता निहाय नोंद करून सण अग्रीम अनुदान मागणी पत्र हे आपल्या कार्यालय प्रमुख यांच्या प्रतीस्वाक्षरीने सत्य छायांकित प्रत व सोबत मागील वर्ष:-2023-24 ह्या आर्थिक वर्षात आपल्या कार्यालयाकडून सण अग्रीम अनुदान रक्कम पूर्ण वसूल केल्या बाबतचा दाखला/प्रमाणपत्र अशी दोन्ही माहिती ह्या विभागातील बजेट कार्यासनाला दिनांक:- 11/10/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तात्काळ सादर करण्यात यावी.
अन्यथा आपल्या कार्यालयातील कार्मचारीचे मागीलप्रमाणेच इच्छुक असलेले कर्मचारींसाठी संख्येनिहाय आवश्यक असलेली दिवाळी सणाग्रीमाचे अनुदान मागणी पत्र हे ह्या विभागास वेळेयर प्राप्त होण्यास विलंब आल्यास मागणी पत्र उशिराने सादर केल्यास याबाबतची जबाबदारी आपल्या कार्यालयाधी राहील व आपल्या कार्यालय स्तरावर सन 2024-25 ह्या चालू वर्षात दिवाळी सण अग्रीम अनुदानाचे वाटप करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
(स्नेहा प्रवार)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र)
जिल्हा परिषद, जळगाव
प्रतः- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प जळगाव यांना माहितीस्तव सविनय सादर.
वरून संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
दिवाळी सण अग्रीम बाबत महत्त्वाची सूचना
फेस्टिवल ऍडव्हान्स
शिक्षक संघटनच्या निवेदनाची दखल घेत शासना कडून शिक्षकांसाठी दिवाळी सण अग्रीम साठी निधी उपलब्ध झाला असून एक दोन दिवसात राज्यभर त्याचे वितरण करण्यात येणार. ऍडव्हान्स रक्कम मध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
दि. २ नोव्हेंबर रोजी मा. ना. दीपकजी केसरकर साहेब (मंत्री- शालेय शिक्षण) यांच्या कडे शिक्षक संघटना सोबत झालेल्या चर्चेच्या वेळी सण अग्रिम चा उपस्थित केला असता - मा. मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित आस्थापनेला दिले आणि तातडीने नस्ती ठेवण्याचे आदेशीत केले. तत्पश्चात ३ नोव्हेंबर रोजी सण अग्रिमसाठी ₹ २३७ कोटी तरतूदीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे.
दिवाळी सण अग्रीम बाबत तरतूद करिता वित्त विभाग मंत्रालय मुंबई येथे फाईल सादर केली असुन सोमवारी किंवा मंगळवारी शालेय शिक्षण विभागाला दिवाळी सण अग्रीम बाबत तरतूद वितरित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या पंचायत समिती नी सण अग्रीम ची मागणी सादर केली नसेल त्यांनी सोमवारी दु 2 वाजेपर्यंत शिक्षक संख्या कर्मचारी संख्या नुसार मागणी सादर करावी.
तरतूद उपलब्ध झाल्यास अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जे शिक्षक मार्च 24 मध्ये से नि आहे त्यांची सण अग्रीम मागणी करण्यात येऊ नये.
यावर्षी शासन स्तरावरुन दिवाळी सण निमित्त मिळणारे सण अग्रीम करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आले नाही.त्यामुळे यावर्षी सण अग्रीम मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
केवळ माहे ऑक्टोबर 23 च्या नियमित वेतनासाठी अनुदान प्राप्त झाले आहे.
माहितीस्तव
शालार्थ वेतन कक्ष
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद, यवतमाळ
प्रति,
गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व) पुणे जिल्हा परिषद पुणे
विषय- सण अग्रिम मागणीबाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपले तालुकाअंतर्गत कार्यरत ज्या शिक्षक कर्मचा-यांना सण अग्रिम घ्यावयाचा आहे अशा कर्मचा-यांची लेखी मागणी घेणेत यावी. सदर मागणीनुसार तालुकानिहाय यादी तयार करणेत येऊन कर्मचारी संख्या व मागणीपत्र तात्काळ शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करणेत यावे..
सदर बाबत कोणतीही दिरंगाई करणेत येऊ नये. मागणी प्रस्ताव प्राप्त न झाल्यास व शिक्षक कर्मचारी सण अग्रिमापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित कर्मचारी /अधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुणे जिल्हा परिषद पुणे
सन अग्रीम अर्ज पीडीएफ डाउनलोड.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments