यु-डायस अपडेट - सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत परिपत्रक

 यु-डायस अपडेट - सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत परिपत्रक.


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक माननीय कैलास पगारे यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई व शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व यांना सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


https://udiseplus.gov.in/


या पोर्टलवर भारत सहकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने देशातील सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र भारत सरकार यांच्या साह्याने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे यु-डायस प्लस प्रणाली मध्ये संकलित केलेल्या माहितीनुसार समग्र शिक्षा मिड डे मिल योजना शिष्यवृत्ती योजना इतर योजनांकरता निधी मंजूर करण्यात येतो. 

यु डायस प्लस प्रणाली मधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक नॅशनल सर्वे स्कूल एज्युकेशन कॉलिटी इंडेक्स निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करणेचे नियोजित केले आहे.

उपरोक्त पत्रानुसार राज्यातील पूर्व प्राथमिक इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती डिसेंबर 2022 पर्यंत टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता कळविण्यात आले आहे.

प्रथम टप्प्यांमध्ये शाळांची प्रोफाइल व शिक्षकांची सविस्तर माहिती नोंदणी करता भारत सरकारकडून प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या प्रणाली मधील अहवालानुसार राज्यातील 220 शाळांची प्रोफाइल माहिती भरणे बाकी आहे व 30000927 शिक्षकांची माहिती प्रणाली मध्ये अद्यावत करणे बाकी आहे.

शाळेतील शिक्षकांची माहिती अंतिम झाल्यानंतर शाळांनी शिक्षकांची माहिती भरून झालेल्या असल्याबाबत प्रणालीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2023 च्या अहवालानुसार तीस हजार 662 शाळांनी शिक्षकांची माहिती अंतिम केली आहे आणि 78 हजार 731 शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केली नाही.

दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत सरकारने विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती भरण्याकरिता प्रणाली दिनांक 15 जानेवारी 2023 ला सुरू केली आहे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या प्रणाली मधील अहवालानुसार राज्यातील 2.20 कोटी विद्यार्थ्यांपैकी 45 लाख विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्यात आली आहे. 


विद्यार्थी माहिती यु-डायस प्लस वर अपलोड करण्यासाठी मार्गदर्शिका डाउनलोड


दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या भारत सरकारकडून यु-डायस प्लस सन 2022 23 मध्ये विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्याबाबत राज्याची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे. त्यामध्ये दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनात येणाऱ्या मोफत सुविधा पाठ्यपुस्तके गणवेश आरटीई प्रवेश व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप शाळा बाही विद्यार्थ्यांची माहिती संगणकीय सुविधा मोबाईल टॅबलेट सहाय्यभूत सुविधा शालेय किचन गार्डन इत्यादी माहिती नोंदवण्याकरिता निर्देश दिलेले आहे.

विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये नोंदवण्याकरिता अडचणी येत असतील अथवा माहिती भरण्याकरता अधिक कालावधीची आवश्यकता असल्याबाबत शाळांकडून मुदतवाढ मिळण्याकरिता विनंती केली असेल तर या कार्यालयास लेखी कळविण्यात यावे जेणेकरून भारत सरकारकडे मुदत वाढीसाठी राज्य शासनाकडून विनंती करण्यात येईल.

भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार कळविण्यात येते की सण 2022 23 या वर्षातील सर्व शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे जेणेकरून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करणे सोयीचे होईल तसेच भारत सरकारकडून याबाबत माही फेब्रुवारी 2023 च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सर्व राज्याचा आढावा घेण्यात येणार असल्याची सूचित केले.

सन 2023 24 समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला दिनांक 31/1/2023 रोजी सादर करण्याकरिता कळविले आहे. भारत सरकारकडून वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास मंजूर करते वेळेस यु-डायस प्लस 2023 24 मध्ये संगणकृत करण्यात येणाऱ्या काळा शिक्षक विद्यार्थ्याबाबत आढावा घेण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून यु-डायस प्लस चे काम करणारे जिल्हा तालुका केंद्र शाळा स्तरावरील संबंधितांना वेळेत माहिती सादर करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आदेशित करावे. 

यु-डायस प्लस सन 2022 23 मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम भरून झाल्यानंतर अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने यु-डायस प्लस प्रणालीवर अपलोड करून संबंधितांना या कार्यालयास पाठवण्याकरिता सूचित करावे.. 

सोबत भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या यु-डायस प्रणालीमध्ये सण 2022 23 ची माहिती भरण्याचे संदर्भीय पत्र प्रपत्र माहिती भरण्याची मार्गदर्शक पुस्तिका सन 2023 24 वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्याचे भारत सरकारची पत्र तसेच दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजीचा यु डायस प्लस प्रणाली वरील शाळा माहिती नोंदणी अहवाल सुलभ माहितीसाठी जोडला आहे.
वरील यु-डायस प्लस संदर्भातील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.