विद्यामृत महोत्सव अंमलबजावणी बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक

 विद्यामृत महोत्सव अंमलबजावणी बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक.


शिक्षक पर्व कार्यक्रमातील विद्यामृत महोत्सव अंतर्गत म्हणजेच मायक्रो इम्प्रूमेंट एलईडी इनोव्हेटिव्ह पॅरागॉजी स्पर्धा संपूर्ण देशात अतिशय उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमार्फत शालेय स्तरावर घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतीचे चित्र दीक्षा ॲप वर मागविण्यात आले होते. यातून उत्कृष्ट अध्यापन पद्धती वापरणाऱ्या शिक्षकांना जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरून सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022 होती. दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यातून एकूण 830 शिक्षक शिक्षक प्रशिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपले चित्र व्हिडिओ दीक्षा ॲप वर अपलोड करून नामांकन केले होते.

दिनांक 13 जानेवारी 2023 अखेर जिल्हास्तरावर 830 शिक्षक शिक्षक प्रशिक्षक यांचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करून एकूण 44 शिक्षक शिक्षक प्रशिक्षक यांची राज्यस्तरावर मूल्यमापनसाठी शिफारस प्राप्त झाली आहे. तसेच राज्यस्तरावर 44 शिक्षक शिक्षक प्रशिक्षक यांचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करून अंतिम 49 शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांची शिफारस प्राप्त झाली आहे  यातील उत्कृष्ट तीन शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्र किती यांची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे हे मूल्यमापन करण्यासाठी पुढील तीन निकष ठरविण्यात आलेले आहे.

1) प्रस्तुत व्हिडिओ चित्रफित किती वेळा पाहण्यात आलेली आहे.

2) चित्रफीत म्हणजेच व्हिडिओ पाहण्याची सरासरी वेळ किती.

3) चित्रफिती प्राप्त व्हिडिओ रेटिंग कसे आहे.

खालील तक्त्यात 15 शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती यांचे दीक्षा प्रणालीवर लिंक एकत्रित स्वरूपात पुरवण्यात आलेले आहेत.

लिंक पुढील प्रमाणे.


https://diksha.gov.in/resources/play/collection/do_3137284674101903361112?contentType=Collection


वास्तव आपण उपलब्ध सोबत दिलेल्या राज्यस्तरावरील अंतिम 15 शिक्षक शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती व्हिडिओ पाहून दिनांक 31 मार्च 2023 अखेर रेटिंग करण्याबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षक विद्यार्थी क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करावे. कृपया प्रस्तुत लिंक वर क्लिक करून आपण उजव्या बाजूस बाजूस सर्व 15 चित्रफिती व्हिडिओ उपलब्ध होतील.

आपण आपल्या अधिनिष्ठ सर्व शिक्षक विद्यार्थी व क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक 31 मार्च 2023 अखेर सर्व 15 चित्रफिती व्हिडिओ एक एक करून पूर्णवेळ पाहण्याबाबत व चित्रफिती चे शेवटी योग्य ते रेटिंग देण्याबाबत संबंधितांना अवगत करण्यात यावे असे निर्देश डॉक्टर नेहा बिल्सरी उपसंचालक आयटी व प्रसारमाध्यम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी

विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व यांना दिले आहे.




वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.