वेतन अपडेट - माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक

वेतन अपडेट - माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक.


शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य या कार्यालयातील दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित पत्रानुसार माहित फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीनुसार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार लेखाशीर्षामध्ये माही फेब्रुवारीच्या वेतनात सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला हप्ता व दुसरा हप्ता तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याचे दिसून येत असून त्यानुसार माहे फेब्रुवारी 2023 चे वेतन देयकामध्ये ऑनलाईन महागाई भत्तासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता तिसरा हप्ता काढण्यात यावा.


तसेच इतर लेखात शिर्षांमध्ये दिनांक दहा फेब्रुवारी 2023 रोजी च्या बैठकीतील आढाव्यानुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन काढणे पर्यायी शक्य नसल्याने फक्त फेब्रुवारी 2023 नियमित वेतन देयके व महागाई भत्ता च्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन करण्यात यावे.

व त्यानंतर उर्वरित रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक एक फेब्रुवारी 2023 नुसार ऑफलाइन पद्धतीने काढण्याची कार्यवाही करण्यात यावी व नंतर त्याची शालार्थ प्रणाली मध्ये नोंद घेण्यात यावी. तसेच उपलब्ध करतील शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

वरील प्रमाणे निर्देश माननीय दीपक चवणे शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांना दिले आहेत.



वरील शिक्षण संचालक माध्यमिक यांचे फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.