आपली केंद्र शाळा बदलणार? केंद्र समूहाची सुधारित संरचना करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांची मुकाअ यांना पत्र

केंद्र समूहाची सुधारित संरचना करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांची मुकाअ यांना पत्र.


प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयातून निर्गमित दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना केंद्र समूहाची सुधारित संरचना करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना केल्या आहेत.


शासनाच्या निर्णयान्वये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाची सूक्ष्म नियोजन सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकूण 4860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


सदरची केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या दहा प्राथमिक शाळा करिता एक या प्रमाणात निश्चित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत नवीन शाळा मंजूर झालेल्या आहेत त्यामुळे सदर मंजूर केलेली केंद्र समूहाची संरचना सुधारित करणे आवश्यक असते बाबत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांनी दिनांक फेब्रुवारी 2023 रोजी सूचना व निर्देश दिले आहेत.


सद्यस्थितीत मंजूर असलेल्या पदांमध्ये समान शाळा वाटप व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून केंद्र समूहाची सुधारित संरचना करण्यात यावी.


त्यानुसार आपण सुधारित संरचनांचा केंद्रनिहाय प्रारूप आराखडा तयार करून दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत केंद्र समूहाची सुधारित संरचनेचा प्रत्येक केंद्रास जोडण्यात आलेल्या शाळांच्या नावासह प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करावा अशा सूचना वजा निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.