शालेय शिक्षण विभाग स्तरावरील राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या १०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्जाची पडताळणी करणेबाबत. सन २०२२-२३ ते २०२५-२६ शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 22 जून 2026 पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्रमांक : शिसंयो/एनएमएमएस/यो-२/२०२६/यो-४०३/
दि : २२ जून, २०२६
तात्काळ / कालमर्यादीत
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
विषय : शालेय शिक्षण विभाग स्तरावरील राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या १०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्जाची पडताळणी करणेबाबत. सन २०२२-२३ ते २०२५-२६
संदर्भ : केंद्र शासन स्तरावर प्राप्त दिनांक २२.०६.२०२६ चा ई-मेल संदेश
उपरोक्त विषयाबाबत शालेय शिक्षण विभाग स्तरावरील राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या १०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२२-२३ ते सन २०२५-२०२६ या वर्षातील शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही झालेली आहे.
सद्यस्थितीत केंद्र शासन स्तरावरून एनएसपी पोर्टलवर तपासणी केली असता सन २०२२-२३ ते २०२५-२०२६ मध्ये शिष्यवृत्ती वितरण करतांना विविध कारणांमुळे विद्याध्यर्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकलेला नाही. कारणांची यादी या पत्रासोबत जोडण्यात आली आहे.
करीता यापत्रासोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जिल्हानिहाय जोडण्यात आलेली आहे, आपण आपल्या स्तरावर संबंधित शाळा / विद्यार्थी यांचाशी संपर्क साधुन प्रलंबित अर्जाची पडताळणी करून प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
प्रलंबित अर्जाची पडताळणी पुढील आठ दिवसांत पुर्ण करावयाची आहे, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. उक्त प्रकरणी दर मंगळवारी प्रगती अहवाल संचालनालयास ई-मेल द्वारे कळवावे.
(कृष्णकुमार पाटील)
शिक्षण संचालक (योजना)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव सादर
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सादर
Sr No Reason
Beneficiary Created based on UID, but account is Invalid.
Beneficiary Created based on UID,as PFMS did not receive any response from bank
Rejected by Bank, Account No does not exist in Bank
Rejected by Bank, Account status is closed.
Rejected by Bank, As per Bank Account Number is Invalid. .
UID is Disable for DBT and account is invalid
UID is disable for DBT and beneficiary has been created based on account UID NEVER ENABLE FOR DBT and account is invalid.
UID never enabled for DBT and beneficiary has been created based on account
10 Beneficiary Created based on UID, but account is Blocked.
IFSC Code either not present or currently inactive in tbl Bank Branch Invalid IFSC Code., IFSC Code either not present or currently inactive in tbl Bank Branc
NO response received from concerned bank within 3 days, therefore PFMS has Created Beneficiary based on information shared on request file.
UID NEVER ENABLE FOR DBT and account is Rejected due to no response received from bank within specified days
15 Beneficiary created based
UID is Disable for DBT, Beneficiary created based on Aadhar but Account No. failed in 1st level validation due to Bank Name is not as per PFMS Bank Master. UID NEVER ENABLE FOR DBT, Beneficiary created based on Aadhar but Account
No failed in 1st level validation due to Bank Name is not as per PFMS Bank Master. UID is Disable for DBT (For the year 23-24, 24-25, 25-26)
19 ) UID NEVER ENABLE FOR DBT (For the year 23-24, 24-25, 25-26)
एन एम एम एस परीक्षेसाठी अंशतः अनुदानित व स्वयं अर्थ सहित शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा आदेश मागे घेण्याबाबत परिपत्रक.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022 मध्ये अंशतः अनुदानित व स्वयं अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा आदेश मागे घेण्याबाबत निवेदन प्राप्त झाले होते.
सदर निवेदना ला स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले आहे.
निवेदला उत्तर देताना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येते सदर परीक्षेमध्ये विनाअनुदानित स्वयं अर्थ सहित अंशतः अनुदानित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अपात्र केल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे तरी या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परवानगी देऊन न्याय द्यावा तसेच कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये असे आपण निवेदनाद्वारे कळवले होते.
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पत्रा अन्वय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षेसाठी खालील नमूद केलेल्या अटीप्रमाणे शाळा व विद्यार्थी सदर परीक्षेसाठी पात्र किंवा अपात्र ठरतात.
खालील विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत:-
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी.
विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चा विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
पालकांचे म्हणजेच वडिलांचे व आईचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3 लक्ष 50 हजार पेक्षा कमी असावे.
खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहे:-
खाजगी विनाअनुदानित स्वयंअर्थसाहित अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यालयामार्फत परीक्षा बाबतची कार्यवाही केली जाते.
वरील प्रमाणे स्पष्टीकरण देत परीक्षा परिषदेने एन एम एम एस परीक्षेसाठी अंशतः अनुदानित व स्वयं अर्थ सहित शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏






0 Comments