PM-Poshan Update - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे लेखापरीक्षण करणे बाबत शिक्षण आयुक्त यांचे आदेश.

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे लेखापरीक्षण करणे बाबत शिक्षण आयुक्त यांचे आदेश.


शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 2 डिसेंबर 2022 निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत म्हणजेच पूर्वीच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांचे लेखापरीक्षण करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये या अगोदर निर्गमित केलेल्या आदेशानुसार शाळांच्या लेखापरीक्षणाच्या कार्यवाहीचे कामकाज सुरू आहे. सर्व जिल्ह्यांना लेखापरीक्षणासाठीची कार्यवाही प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यामध्ये मागील आठवड्यापासून शाळांकडून माहिती संकलित करून वेबसाईटवर अद्यावत करण्याचे काम सुरू झाले आहे जिल्हा निहाय लेखापरीक्षण विषयक कार्यवाहीच्या सद्यस्थितीचा अहवाल सोबत जोडला असून अनेक जिल्ह्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे दिसून येत आहे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी व्यक्तिशः जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा शिक्षणाधिकारी यांचे मार्फत नियमित आढावा घेऊन निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांकडून आठवड्या खैर माहिती संकलित करून सदरची माहिती तालुका स्तरावरून दिलेल्या संकेतस्थळावर पुढील आठवड्यात अद्यावत होईल याचे सनियंत्रण करावे व जिल्ह्यांमध्ये सदरची कार्यवाही खालील नियोजनानुसार पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

5 डिसेंबर 2022 पर्यंत शाळांकडून विहित नमुन्यातील माहिती तालुकास्तरावर संकलित करणे.

20 डिसेंबर 2022 पर्यंत शाळांकडून संकलित नमुन्यातील माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे.

एक जानेवारी 2023 ते 20 मार्च 2023 पर्यंत शाळा तालुका जिल्हा परिषद महानगरपालिका तसेच योजनेच्या लाभ घेणाऱ्या यंत्रणांचे लेखा परीक्षण करणे.


जिल्हा निहाय आढावा घेण्यासाठी सदर संकेतस्थळाची लॉगिन आयडी व पासवर्ड शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.