विधानपरिषद विशेष उल्लेख मुद्दा क्र. ४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र कृपया पहावे.
उपरोक्त विषयांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतींसह सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते.
तथापि, याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही. सदरची बाब अतिशय गंभीर असून, विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता, याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ उलटटपाली सादर करण्याची आपणांस विनंती आहे. सदरचा अहवाल विहीत कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास, याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
जिल्हा परिषदांमधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत विधान परिषदेत तारांक प्रश्न श्री सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांनी विचारला आहे.
याबाबत ग्राम विकास विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे माहिती मागवली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत" श्री. सत्यजित तांबे, मा.वि.प.स. यांनी तारांकित प्रश्न क्र. १८६० उपस्थित केला आहे. सदरचा प्रश्न हा स्वीकृत असून, याबाबत आपले अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व प्रश्न भाग निहाय उत्तर पुरक टिप्पणीसह शासनास तात्काळ उलट टपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे.
तसेच त्यासोबतच सदर प्रश्नासंदर्भात विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख या पदांबाबतची विभागनिहाय एकत्रित माहिती खालील विवरणपत्रात भरुन शासनास सादर करण्यात यावी.
सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षण विभागांतर्गत पर्यवेक्षीय यंत्रणा आणि प्रशासन या गटातील विस्तार अधिकारी शिक्षण तसेच केंद्रप्रमुख आदी मंजूर पर्दामधील ५० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने कार्यरत शिक्षण यंत्रणेवर अतिरिक्त ताण असल्याचे माहे जानेवारी, २०२५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये नेट सेट या उच्च शैक्षणिक पात्रताधारक शिक्षक कार्यरत असून त्यांनी विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख अशा वरिष्ठ पदांवर पदोन्नती देण्याची मागणी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, सदरील शिक्षकांना पदोन्नती दिल्यास कार्यरत असणाऱ्या शिक्षण यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?
राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पीएचडी नेट सेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदामध्ये सामावून घेणे बाबत ग्रामविकास विभागाचा शासन आदेश.
ग्राम विकास विभागाने दिनांक आठ डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पीएचडी नेट सेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये सामावून घेण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
श्री मंगेश चव्हाण चाळीसगाव व इतर विधानसभा सदस्य यांनी विधानसभेत उपस्थित केलेला तारांकित प्रश्न क्रमांक 40 हजार 220 यानुसार तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने आपला सविस्तर अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रश्नोत्तर स्वरूपात शासनाला ई-मेल दिनांक 12 डिसेंबर पर्यंत करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अच्युत इप्पर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत.
वरील आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments