Income Tax Update - 2022-23 चे आयकर विवरण पत्र भरताना खालील बाबींचा विचार करून विवरणपत्र भरावे.

 2022-23 चे आयकर विवरण पत्र भरताना खालील बाबींचा विचार करून विवरणपत्र भरावे.


1) विवरणपत्रात पगार नोंदविताना Paid in लिहावा. (मार्च चा पगार एप्रिल महिन्यात)

     

2) वाहन भत्ता :- मार्च पेड एप्रिल (400 ₹ ), मे पेड जून (44 ₹ ) व जून पेड जुलै ( 810 ₹ ) आहे. इतर महिन्यात तो पूर्ण ( 1350 ₹ ) मिळाला आहे.


3) DCPS धारकांचा 14% NPS हिस्सा उत्पन्नात येत आहे, परंतु वजावटीमध्ये सुद्धा एकूण पगाराच्या 10 % पर्यंत NPS शासन हिस्सा वजावट 1,50,000 पुढे मिळणार आहे. यामुळे टॅक्स स्लॅब बदल होत नाही. त्यामुळे टॅक्स मध्ये वाढ होत नाही.


4) जुलै पेड ऑगस्ट मध्ये 400 रू ध्वज निधी कपात झाला आहे.


5) माहे एप्रिल पेड मे मध्ये महागाई फरक व घरभाडे भत्ता फरक मिळाला आहे. तो नोंदवावा.

    तसेच एप्रिल पेड मे पासून वाहन भत्ता 400 ₹ वरून 1350 ₹ झाला आहे. अपंग भत्ता 2000 ₹ वरून 2700 ₹ झाला आहे.


6) जुलै पेड ऑगस्ट मध्ये वेतनवाढ आहे. यामुळे मूळपगार, महागाई भत्ता व घरभाडे यात वाढ होत आहे.

 

7) आयकर कपात :- एप्रिल पेड मे पासून ते डिसेंबर पेड जानेवारी पर्यंत असे एकूण 8 महिनेच होईल. ज्यांचा पगारातून 8 महिने कपात झाला आहे त्यांनी कपात दाखवावी.   

8) व्यवसाय कर फेब्रुवारी पेड मार्च ला 300 रू नोंदवावा.

तसेच दरमहा स्टॅम्प तिकीट 1 ₹ कपात दाखवावी.


10) पगाराव्यतिरिक्त उत्पन्नात मुदत ठेवीवरील व्याज नोंदवावे. (मुदत ठेवीच्या वेळी बँक आधार व पॅन कार्ड अटॅच करत असल्याने ते TIS Report मध्ये ऑनलाईन दिसते. त्यामुळे कोणीही ते लपवू नये.)


11) विवरणपत्रासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड , पगारा व्यतिरिक्त गुंतवणूक, घरकर्ज डिटेल्स यांच्या झेरॉक्स जोडावेत.


12) विवरणपत्रावर पर्मनंट मोबाईल नंबर अचूक लिहावा.


13) शक्यतो सर्वांना OLD REGIM फायदेशीर आहे.


14) सप्टेंबर पेड आक्टोंबर मध्ये महागाई भत्ता वाढ व पूर्वीचा महागाई भत्ता वाढ फरक मिळाला आहे. तो नोंदवावा.. 


15) आपला टॅक्स कोणत्या पद्धतीने काढावा याची नोंद विवरणपत्राच्या वरच्या बाजूला OLD REGIM किंवा NEW REGIM लाल पेनने ठळक नोंदवावे.


16) पगारपत्रक उपलब्ध नसल्यास आपल्या केंद्राचे शालार्थ चे काम करणाऱ्या शिक्षक बांधवांशी संपर्क करून प्राप्त करावे.


17) शेअर मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट डिटेल्स प्राॅफीट अ‍ॅण्ड लाॅस अकाउंट स्टेटमेंट जोडावे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.