STARS प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नाव नोंदणी करणेबाबत MIEPA च्या संचालकांचे पत्र व लिंक

 STARS प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नाव नोंदणी करणेबाबत MIEPA च्या संचालकांचे पत्र व लिंक.


STARS: MIEPA प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक अथवा प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरता नाव नोंदणी करणेबाबत महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद च्या संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत केंद्र शासन पुरस्कृत Strengthening Teaching - Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ जून 2022 ते 17 जून 2022 कालावधीत निवड करण्यात आलेले नोडल अधिकारी आणि जिल्हा अथवा तालुकास्तरीय प्रशिक्षण यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न झाले आहे.

सदर उपक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे FIRKI App च्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

FIRKI APP DOWNLOAD


याकरिता आपल्या जिल्ह्यांतर्गत उपरोक्त नमूद व्यवस्थापनाच्या शाळा अथवा विद्यालयांमध्ये कार्यरत मुख्याध्यापक प्राचार्य किंवा प्रभारी किंवा तात्पुरता प्रभार असलेले वगळून यांना पुढे दिलेल्या गूगल लिंक वर दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

प्रत्यक्ष ऑनलाइन प्रशिक्षणाचे वेळापत्रक आणि इतर तपशील स्वतंत्ररित्या आपणास पाठवण्यात येईल प्रशिक्षणाकरता नाव नोंदणी करण्यासाठी लिंक.

https://forms.gle/zGndBcuUmjASFbpF8


वरील लिंक वर टच करून मुख्याध्यापक आपली स्टार्स प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंद करू शकता.


वरील प्रमाणे निर्देश उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई दक्षिण, पश्चिम आणि उत्तर विभाग यांना माननीय रमाकांत काठमोरे, संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांनी दिले आहेत.



वरील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद च्या संचालकांचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.