शालेय पोषण आहार अपडेट - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सरल या वेबसाईटवरील दैनंदिन उपस्थिती भरणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सरल या वेबसाईटवरील दैनंदिन उपस्थिती भरणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र.


महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सरल या वेबसाईट वरील दैनंदिन उपस्थिती भरणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक शाळेने शाळा स्तरावर दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्याची माहिती.. 

https//education.maharashtra.gov.in

या वरील संकेतस्थळावर नियमितपणे अद्यावत करणे आवश्यक आहे. माही नोव्हेंबर 2022 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत शाळांना सदरची डाटा एन्ट्री करता आलेली नाही. सदरचे संकेतस्थळ आता नियमितपणे सुरू झाले असून शाळांना माही नोव्हेंबर 2022 मधील प्रलंबित दिवसांचा डाटा एन्ट्री करण्याची सुविधा शाळा लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सर्व शाळांनी त्यांची माहे नोव्हेंबर 2022 ची आहार वितरण केलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री एका आठवड्याच्या आत पूर्ण करून घ्यावी. शिक्षणाधिकारी यांनी स्वतः शाळांच्या दैनंदिन डाटा एन्ट्री चे तालुका निहाय स नियंत्रण करावे तसेच सर्व शाळांना लेखी निर्देश जिल्हास्तरावरून निर्गमित करावेत तसेच या पुढील कालावधीमध्ये देखील सर्व शंभर टक्के शाळा नियमितपणे डाटा एन्ट्री करतील याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहेत.



वरील शालेय पोषण आहार बाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.