शैक्षणिक सत्र 2023-24 पासून इयत्ता तिसरी पासून होणार परीक्षा...राज्य शासन राबवणार शिक्षणाचे 'केरळ पॅटर्न'.

शैक्षणिक सत्र 2023-24 पासून इयत्ता तिसरी पासून होणार परीक्षा राज्य शासन राबवणार शिक्षणाचे केरळ पॅटर्न.


राज्य शासन पुढील वर्षापासून शिक्षणाचा केरळ पॅटर्न राबवणार असून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अमुलाग्र बदल कडून आणण्यासाठी राज्य सरकार राज्यात आता पुढील वर्षी यापासून तिसरीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या परीक्षा घेण्यात येतील.

राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठवले जाते काही खाजगी शाळा वगळता सरकारी शाळांमध्ये परीक्षा घेतली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी राहिली नाही. नापास होणारच नाही तर अभ्यास कशासाठी करायचा अशी मानसिकता तयार झाल्यामुळे त्यांची वाचनही कमी झाले आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी राजस्थान गुजरात आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत आहे. राज्य शिक्षण संचालक कैलास पागोरे म्हणाले महाराष्ट्रात आठवीपर्यंतच्या परीक्षा बंद करण्यात आलेल्या आहेत पण शेजारच्या राजस्थानमध्ये पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बोर्डामार्फत परीक्षा घेतल्या जात आहे तर गेल्या वीस वर्षापासून पंजाब मध्ये परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची बँक आहे. केरळमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी खाजगी शिक्षण संस्थांना पसंती दिली जाते. इंग्रजी सहस स्थानिक भाषेमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे. पण तितकाच विश्वास सरकारी शिक्षणावरही आहे त्यामुळे तेथील प्राथमिक विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. शिक्षणाच्या बाबतीत शेजारच्या राज्यांनी 73 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी केली आहे त्यामुळे आपण शिक्षण धोरणात बदल करण्याचा विचार केला आहे तिसरीच्या सराव परीक्षा बाबत शिक्षणमंत्री केसकर सकारात्मक आहे याबाबत ते लवकरच घोषणा करतील अशी शक्यता शिक्षण संचालकांनी व्यक्त केली आहे. सराव परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास किंवा गुण कमी मिळाल्यास विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल पण त्याला पुढील वर्गात जाण्यापासून रोखले जाणार नाही असेही पागोरे यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे 'केरळ पॅटर्न'? 

प्राथमिक शाळा चालवण्याची व नोकर भरतीचे अधिकार ग्रामपंचायतींना.

माध्यमिक शाळांचे अधिकार जिल्हा परिषद यांना.

प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा.

कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा.

दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल. 

प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक वडील आणि माता असोसिएशन.

विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी कुटुंबश्री योजना.

विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मेळावा.

विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन.

जनावरांच्या डॉक्टरांच्या नियुक्तीचे अधिकार हे ग्रामपंचायतींना.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.