राज्य शासनाकडून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याबाबतच्या अर्थसंकल्पीय तरतुदी बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाची माहिती पुस्तिका

राज्य शासनाकडून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याबाबतच्या अर्थसंकल्पीय तरतुदी बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाची माहितीपुस्तिका.


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने म्हणजेच पूर्वीच्या समाज कल्याण विभागाने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याबाबतची अर्थसंकल्पीय तरतुदी बाबतची सन 2022 23 साठी ची माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे सदर माहिती पुस्तकेत राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्यासाठी शासनाने केलेली तरतूद उपलब्ध आहे.

मागासवर्गीयाच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागाने चार प्रकारच्या योजना आखल्या आहेत ज्यामध्ये.

शैक्षणिक सवलती, 

आर्थिक उन्नती, 

गृहनिर्माण, 

इतर योजना.

अशा चार प्रकारांमध्ये योजना राबविल्या जातात.

प्रधान लेखाशीर्ष 225 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण मागणी N - 3

शैक्षणिक सवलती

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मागासवर्गीय मुला-मुलींकरिता मॅट्रिकपूर्व शिक्षण फी परीक्षा योजना.

माध्यमिक शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.

इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणे.

भारत सरकारची शालांत परीक्षे उत्तर शिष्यवृत्ती योजना.

सफाई कामगारांच्या मुलांकरिता निवासी शाळा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यावेतन.

सैनिकी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.

वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयांमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना.

अस्वच्छ व्यवसाय काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती प्रदान करणे.

शासकीय वस्तीगृहे.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

अनुदानित वस्तीगृह.

बालवाडी.

अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी अनुदानित आश्रम शाळा.

मागासवर्गीय मुला-मुलींच्या अनुदानित वस्तीगृहाच्या इमारती विस्तार बांधकामासाठी अनुदान मंजूर करणे.

इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या वस्तीगृहांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.

वरील प्रमाणे जवळपास 27 योजना इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जातात.

या योजनांबाबत व इतर सर्व योजनांबाबत माहिती घेण्यासाठी आपण सामाजिक न्याय विभागाने 2022 2023 या वर्षासाठी प्रसिद्ध केलेली माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.

Downloadसंपूर्ण माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.