जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आजचे महत्वपूर्ण अपडेट आणि सूचना, शिक्षणाधिकारी लॉगिन ला बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या उपलब्ध

जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आजचे महत्वपूर्ण अपडेट, सूचना, संभाव्य तारखा, शिक्षणाधिकारी लॉगिन ला बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या उपलब्ध.


 


बदली प्रक्रिया 2022 साठी  आवश्यक असलेल्या बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादया EO लॉगीनवर प्राप्त झाल्या असून फक्त सदरच्या याद्या प्रसिद्ध करण्याबाबतचे वेळापत्रक मा. D.S.साहेब यांच्या लॉगीनवरून पोर्टलवर अपडेट केले आहे सदर वेळापत्रकानुसार दिनांक 11-11-2022 ते 12 -11-2022 या कालावधीत यादया प्रसिद्ध करावयाच्या आहेत  त्यामुळे आज दिनांक 11 -11 -2022 रोजी मा. शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीनंतर बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन /ऑफलाईन प्रसिद्ध केल्या जातील.

सदरच्या  यादया सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्व शिक्षक यांच्या लॉगिनला उपलब्ध असणार आहेत.

त्यामुळे सदरच्या दोन्ही यादया आपले गटाकडील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व सदरच्या यादया आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.


सदर यादीबाबत कोणती कार्यवाही करावी हे सुधारित वेळापत्रक प्राप्त होताच कळवले जाईल.


महत्वाच्या सूचना


 लवकरच जिल्हाअंतर्गत बदली बाबत पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल

आपले गटाकडील सर्व शिक्षकांना दि07/04/2021 व बदली संदर्भात ग्राम विकास विभागाकडून प्राप्त झालेली सूचना पत्र काळजीपूर्वक वाचण्यास सूचना द्याव्यात

शक्यतो  या दरम्यान केंद्र संमेलन असल्यास शासन निर्णयाचे सामूहिक वाचन करावे जेणेकरून त्यावर चर्चा करून मार्गदर्शन मिळू शकते.

काही वेळेस बदली संदर्भात इतर ठिकाणाहून VDO व PPT प्राप्त होत असतात  त्यामधील काही सूचना 100% अचूक असतीलच असे नाही म्हणून दि.07/04/2021 चा शासन निर्णय,ग्राम विकास विभागाकडील सूचनापत्र तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO तसेच जिल्हा स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचना या व्यतिरिक्त इतर कोणत्याही अन्य मार्गाने बदली संदर्भात केलेले मार्गदर्शन व त्यामुळे आपल्या बदलीत काही अडचण समस्या निर्माण झाल्यास ती जबाबदारी संबधित शिक्षकांची राहील या बाबत सर्वच सूचना द्याव्यात.


जिल्हातंर्गत शिक्षक बदली अपडेट 11 नोव्हेंबर 2022  


व्हिन्सीस कडुन जिल्हांतर्गत बदलीसाठीच्या बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक याद्या राज्यातील सर्व मा.EO लॉगिनवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सदर याद्या जिल्हा स्तरावरून जिल्हा शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी तालुका निहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.


लवकरच नवीन वेळापत्रक शासनस्तरावरून निर्गमित होण्याची शक्यता आहे.


जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत राज्य सरकार कडून दिलेली अपडेट.


राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.



बदल्यांच्या वेळापत्रकामध्ये किरकोळ बदल करून सदर तारखा उद्या जाहीर करून  बदल्यांची ही प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.


बदली पात्र शिक्षकांच्या याद्या व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर संवर्ग 1 व संवर्ग 2 ला होकार किंवा नकार देण्यासंदर्भात तारखा जाहीर होतील.


संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या शिक्षकांनी होकार किंवा नकार दर्शविल्यानंतरच जाहीर होतील.


खालील प्रक्रिया संभाव्य तारखांमध्ये सुरू होऊ शकते.


24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग 1 मध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल.


संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास,  पूर्वीचीच शाळा कायम राहील.


विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत राहील.


त्यामध्ये 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.


तसेच ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहे


 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.


दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही - असे शासनाकडून कळविण्यात आले.



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.