शिक्षक भरती अपडेट - पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक पदभरती मूळचा व सुधारित तरतुदी शासन आदेश.

 शिक्षक भरती अपडेट -

 पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक पदभरती मूळचा व सुधारित तरतुदी शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी पवित्र पोर्टल PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे किंवा वगळणे किंवा नवीन तरतूद समावेश करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


दिनांक 7 फेब्रुवारी 2019 चा पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात शासन आदेश


राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच रात्र शाळांमधील शासकीय अनुदानित अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यासाठी शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणाली द्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यक ता असल्याचे निदर्शनास आले आहे. धर्म यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मधील काही तरतुदी बघणे सुधारित करणे बाबत निर्णय घेण्याची व नव्याने तरतुदी समाविष्ट करण्यात येत आहे.

शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मधील पुढील तरतुदी सुधारित करण्यास वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.


शासन निर्णय दिनांक ७ फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 3.4 येथील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील. या तरतुदी ऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होणे अनिवार्य राहील उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण व नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही. असे समाविष्ट करण्यात येत आहे.

शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 3.6 येथील तरतूद यामुळे वगळण्यात येत आहे परंतु उर्वरित तरतुदी यापुढेही लागू राहतील.

पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात येत आहे.

1) शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय covid-19 च्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिलक्षम असेल.

2) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी स्पष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणे अनिवार्य असेल.

3) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षा पुरते मर्यादित राहील या चाचणीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

4) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिरात घेण्यात येतील त्या कालावधीमध्ये असलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

5) विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केलेल्या निवडीसाठी पात्र राहील.




शिक्षक भरती बाबत सुधारित तरतुदी चा पवित्र पोर्टल शी संबंधित शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शिक्षक भरती संदर्भातील दिनांक 7 फेब्रुवारी 2019 चा शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.