जिल्हा अंतर्गत बदली 2022 :- बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणेबाबत.

 जिल्हा अंतर्गत बदली 2022 :- 

बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणेबाबत.



बदली पोर्टलवर सर्व जिल्ह्यांच्या बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या शिक्षणाधिकारी लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.


याद्वारे जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बांधवांना कळविण्यात येते की..


ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण  कार्यरत शिक्षकांपैकी जिल्हा अंतर्गत बदली करीता बदलीपात्र ( सध्याच्या क्षेत्रातील सेवा 10 वर्ष व शाळेवरील सेवा 5 वर्ष )  ठरलेल्या 1715 तसेच बदली अधिकार पात्र (2017 चे शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळेवरील 3 वर्ष सेवा ) अशा 64 शिक्षकांची यादी याद्वारे बदली पोर्टल मध्ये सर्वांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सुलभ संदर्भासाठी pdf स्वरुपात सुद्धा आपले संकेतस्थळाचे माध्यमातून देण्यात येत आहे


सर्व बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांनी सदरील यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी.


या संदर्भाने काही त्रुटी असल्यास सर्वप्रथम आपले तालुका कार्यालयाशी रीतसर लेखी अर्ज व कागदोपत्री पुरावेनिशी संपर्क करावा.


थेट जिल्हा कार्यालयात परस्पर संपर्क करू नये.


लवकरच जिल्हांतर्गत बदली संदर्भाने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे , फॉर्म भरण्याअगोदर सर्व शिक्षकांनी GR चे काळजीपूर्वक वाचन करुन घेण्यास सांगावे. ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन परिपत्रक, Vinsys कडून पोर्टलवर असणारे अधिकृत videos तसेच जिल्हा कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सुचना यावरूनच आपला फॉर्म भरण्यास सांगावे. इतर ठिकाणी दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही केली व त्यामुळे जर बदली मध्ये काही चूक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शिक्षकांची राहील याबाबत सर्वांना अवगत करावे.


तसेच ग्रामविकास विभागाच्या बदली शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना वेळापत्रका नुसारच आपले ऑनलाइन बदली फॉर्म भरण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही करावी.


या संदर्भाने अधिक सविस्तर मार्गदर्शक सूचना-व्हिडिओ इ. आपणांस Vinsys मार्फत यथावकाश OTT पोर्टल वर प्रदर्शित केले जाईल.


बुलढाणा जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


बुलढाणा जिल्ह्यातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


वरील याद्या हे बुलढाणा जिल्ह्याच्या आहे. आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपण आपल्या जिल्ह्याच्या याद्या मिळवू शकता.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.