वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत... मुख्य कार्यकारी अधिकारी

वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत...

- मुख्य कार्यकारी अधिकारी 


"राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार..., ही अफवा आहे. तसा कोणताही शासन आदेश राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला आलेला नाही. शिक्षकांनी नवीन उपक्रम राबवताना जुन्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करू नये. पालक ज्या अपेक्षणी मुलांना शाळेत घालतात त्या अपेक्षाही पूर्ण झाल्या पाहिजे."

आयुष प्रसाद - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या 'चला गुरुसी वंदू' या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांना गौरवण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष्य प्रसाद हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की जिल्हा परिषदेला वीस पटसंख्या पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याबाबत कुठलाही शासन आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे वीस पटसंख्या किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही वीस पटसंख्या किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार ही अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नका. माननीय आयुष प्रसाद हे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदली समितीचे अध्यक्ष आहेत. 

त्यामुळे शासन स्तरावर एका महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्याचे हे वक्तव्य आहे. अर्थात कोणतीही शाळा बंद होऊ नये ही जनभावना आहे. या अगोदरही शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. 

सदर कार्यक्रमात माननीय आयुष प्रसाद असेही म्हणाले की  "अमेरिकेत व प्रदेशात शैक्षणिक दर्जा उच्च आहे. आपल्याला शिक्षणाचा दर्जा उंचवायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. आदर्श शाळा व शैक्षणिक धोरण कसे असावे याचाही विचार करण्याची गरज आहे. नवीन उपक्रम करताना जुन्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करू नका. काही लोकांकडून शाळेच्या मदतीसाठी काही उपक्रमांसाठी निधी घेताना शासन नियमांचे पालन करा. मी काय केले ते इतरांनी स्वीकारावे ही अपेक्षा ठेवून काम करू नये. राज्य सरकारने जी सांगितले ते करा."


समाजाची संस्कृती घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. स्वतः चांगले आचरण करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. नुसते बोलून चालत नाही. संविधानामध्ये असलेल्या न्याय समाजाची आपण उभारणी केली पाहिजे. चांगल्या समाजाची रचना शिक्षकांनी केली पाहिजे. चांगली शिक्षण पद्धती राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करा.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.