शासन आदेश असूनही कर्मचाऱ्यांची दिवाळी वेतनाविनाच! बोनसही नाही! तुटपुंज्या अग्रीमवर दिवाळी साजरी!

 शासन आदेश असूनही कर्मचाऱ्यांची दिवाळी वेतनाविनाच! बोनसही नाही! 

तुटपुंज्या अग्रीमवर साजरी! 


दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी यांची वेतन दिवाळी अगोदर दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी करणे बाबत सर्व विभागांना निर्देश दिले होते.

परंतु अपवाद वगळता कुठेही 21 ऑक्टोबर 2022 रोजी शासन आदेशानुसार वेतन अदा केले गेले नाही. 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व निम शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्या प्रमाणे कुठलेही बोनस दिले जात नाही. केंद्र शासन व काही कंपन्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त एका महिन्याचे वेतन बोनस म्हणून देतात परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना असे बोनस देणे राज्य शासनाने कधीचेच बंद केले आहे.

आधार एवढाच की राज्य शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी यांना सन अग्रीम रक्कम म्हणून 12500 ₹ एवढी रक्कम दिवाळीला देऊन ती समान 10 हप्त्यात किंवा पाच हप्त्यात नंतरच्या पगारातून कापून घेतली जाते. आणि एवढीच रक्कम यंदाच्या दिवाळीला दिवाळी साजरी करण्यासाठी राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना मिळाली आहे.



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.