मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई-वडिलांना देखील मिळते कुटुंब निवृत्ती वेतन वित्त विभागाचा शासन निर्णय

 नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा दुसरा शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केला आहे.

सदर शासन निर्णयानुसार मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई-वडिलांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सेवेत असताना अथवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास चरितार्थाचे साधन नसल्याने पूर्णतः त्याच्या / तिच्यावर अवलंबून असलेले त्याचे / तिचे पालक महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अन्वये कुठल्याही कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र होत नाहीत. प्रचलित सेवानिवृत्तीवेतन नियमातील कुटुंब या संज्ञेच्या व्याख्येत शासकीय कर्मचाऱ्याचे पालक समाविष्ट नाहीत हे त्याचे कारण आहे. सामाजिक सुरक्षेचा उपाय म्हणून सेवानिवृत्तीवेतन नियमात आता सुधारणा करण्यात आलेली असून त्यात व्याख्या केलेल्या कुटुंब या संज्ञेच्या व्याप्तीचा विस्तार करून त्यात केवळ एकट्या शासकीय कर्मचाऱ्याच्या पालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकटा शासकीय कर्मचारी या [संज्ञेचीही त्याप्रमाणे व्याख्या करून ती महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. या इच्छित सामाजिक सुरक्षा उपायास मूर्त स्वरूप देण्यासाठी खालील निर्णय घेण्यास शासनास हर्ष होत आहे.


शासन निर्णय-


4) हा शासन निर्णय तो निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अमलात येईल व या शासन निर्णयाच्या प्रयोजनार्थ तो नियत दिवस असेल.


२) "एकटा' शासकीय कर्मचारी म्हणजे आपल्या पालकांचे हयात असलेले एकमेव अविवाहित अपत्य अथवा विवाहित असल्यास ज्याची/ ज्याचा पत्नी / पती व मुले हयात नाहीत असा शासकीय कर्मचारी. ३) 'एकट्या शासकीय कर्मचान्यावर पूर्णता अवलंबून असलेले पालक म्हणजे आपल्या आर्थिक निर्वाहासाठी ज्यांच्याकडे कोणते / साही साधन / खोत नाही व आपल्या सर्व गरजांसाठी जे त्याच्या / तिच्यावर पूर्णतः अवलंबून आहेत, असे पालक. निवृत्तीवेतन नियमातील नियम ११६ या खंड (१६) (बी) (एक). (दोन) आणि (तीन) प्रमाणे असलेले

कुटुंब अस्तित्वात नसेल तरच मृत पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णतः अवलंबून असलेले पालक कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र ठरतील 

५ मृत पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्याने खाली अनुक्रमांक (६) मध्ये विहित केलेल्या वेळेत

व पद्धतीने आपल्या पालकांची नावे घोषित केलेली असतील केवळ तरच अशा शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णतः अवलंबून असलेले त्याचे/तिचे पालक कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र असतील.


शासन निर्णय क्रमांक निचे २०११५४४


६) जो शासकीय कर्मचारी,


(अ) नियत दिवशी शासकीय सेवेत आहे व ज्याला निवृत्तीवेतन नियम लागू आहेत तो सध्याच्या विभाग प्रमुखाकडे अथवा त्याचा / तिचा कार्यालय प्रमुख वर्ग -1 पेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसल्यास यथास्थिती, त्यांच्याकडे असे घोषणापत्र सादर करू शकेल.

त्याच्या

(ब) जो शासकीय कर्मचारी नियत वयोमानानुसार अथवा स्वेच्छानिवृत्तीद्वारे नियुक्त दिनांका अगोदरच सेवानिवृत्त झालेला आहे व 'नियत दिवशी निवृत्तीवेतनाचा लाभ उपभोगत आहे तो त्याच्या/ तिच्या सेवानिवृत्तीच्या वेळी तो / ती ज्या कार्यालयात कार्यरत होता होती त्या कार्यालयाच्या विभाग प्रमुखाकडे अथवा त्याच्या / तिच्या त्या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख वर्ग-1 पेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसल्यास यथास्थिती, त्यांच्याकडे 'नियत दिवसापासून नव्वद दिवसांच्या कालावधीत असे घोषणापत्र सादर करू शकेल.

ज्या शासकीय कर्मचाऱ्याने,


(१) वर विहित केल्याप्रमाणे घोषणापत्र सादर करण्यात कसूर केली असेल, आणि

(२) ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा (अ) विभागीय चौकशीच्या प्रलंबिततेच्या कालावधीत अथवा

(ब) अनधिकृत अनुपस्थितीच्या कालावधीत मृत्यू झाला असेल,


अशा शासकीय कर्मचाऱ्याचे पालक कुटुंब निवृत्तीवेतनाच्या लाभास पात्र असणार नाहीत. <) शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता क अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये


[व] कृषि विद्यापीठे यांमधील पात्र निवृत्तिवेतनधारक कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह, लागू राहील.


महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे पात्र निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.


१०) यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या • अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शीर्षाांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा...


११) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील,



वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

9 Comments

  1. नमस्कार मान्यवर.मी औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव अपघाताने दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून व बेरोजगार पती ची सामाजिक न्याय मंत्रालयाचे युनिक डिसेबिलिटी कार्ड नुसार पत्नी नाते पालक होते आता कर्मचार्याचा अपंग बेरोजगार जोडीदार चे न्यायदाते पती कायद्यांशी लढत पण कोरोनाने नाही मयत अशा 11/11/2020पासून अपंग बेरोजगार पती ची विधवा शिक्षिका पत्नी आताही एकटी आहे.जी पेन्शन पतीला मिळाली असती तीच पेन्शन विधवा कर्मचारी च्या दोन अपत्य यांना आजीवन विभागून देण्यात यावी.कुणाचा वाटा ना तोटा.जोडीदार अठरा पेक्षा मोठाच तरी आयुष्यभर नियमांनी पगार जोडीदार ची पेन्शन व विशेष अपत्य तर आजीवन पेन्शन तीन स्त्रोत उत्पन्नाचे आहेत हेही भावंडं शिक्षकांचेच लेकरं आहेत एकल महिलेचे.ती पेन्शन कुठं जात आहे..आधीच शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून ए ग्रेड वर शिक्षणसेवक पासून जात मराठा तेव्हा पासून माजी सैनिक वडील अल्पभूधारक सासरे अपंग बेरोजगार पती तिघे देवाघरी गेले तिसरी पिढी न्यायासाठी लढत आहे.जोडीदार एका घरात दोन घरभाडे विशेष रजा विशेष क्रीडा रजा बालसंगोपन रजा सव्वा लाख आयकरसूट आहे.विधवा कर भरते.मुलांची पूर्ण फीस भरते,मरण फक्त कोरोनाने नाही मयत सगळे पुरुष कमवते नाही कोरोनाकाळी मयत जोडीदार च्या पेन्शन न घेणार्या विधवा कुठं तरीमोजा.सुरक्षाबीमा बारा रूपये विमा कपात आहे अजून अॉटो डेबिट.अपघाताने दोन्ही पायांनी कायमचे अपंग आता मयत तर ते दोन लाख रुपये द्या.विधवांना मालमत्ता पाणीपट्टी अकृषक कर सूट द्या.अपंगपती वाहने साठी हातांत ब्रेक गिअर साठी पुण्याहून साठ हजार रुपये खर्च लागला.अपंग कर्मचारी तर तिपटीहून कमी.बालसंगैपन रजेत अपंग पती टाकावे 99अर्जित रजा तीन जिल्हा बॉंड्रीवरील शाळेत गेल्या माझ्या लेकरं सहावी आठवीचे तरीही.पती खूप आजारी होते.शासकीयचे नियमित पूर्णवेळ बीएड केंद्रीय सीईटी नेमेरिटची शिक्षा एकटीची 285दिवस तेथे हजर म्हणून शाळेत गैरहजर फुलंब्री हायस्कूल ला तर ती सांगेन ऊ महिने बिनपगारी रजा लागली एक वेतनवाढ सहाव्या वेतन आयोगाने गेली.खाजगी शिफ्ट अर्धवेळ बीएड एम एड पीएचडी वाले पाच महिन्यांत पदवी व सात महिने शाळेत हजर मग नियमित वेतनवाढ व पदोन्नती ओके.तसेच दोन्ही कडे आधार कार्ड असलेले विद्यार्थी शिक्षकांसारखे दिसत आहेत.रजा पगार पदोन्नती त तिसरे ..एम एड ए संस्कृत बीएड पर्यंतसगळे ए ग्रेड..एक जादा वेतनवाढ नाही.शासकीय डीएड बीएड तरी नाही.युनिक डिसेबलिटी कार्ड तरी व्यवसायकर रोड टॅक्स सूट नाही.वाहने विधवा नावे हो पुन्हा कर खर्च नको.प्रभार सक्षमपणे सांभाळते चार वर्षे पासून मुअचा.विधवा विधुर पदोन्नती स्वतंत्र यादी हवी.पदवीधर पदी उपस्थित दिनांक फुलंब्री तालुक्यातील एलसीडी शेवटी झाल्याने खूप नुकसान होत आहे.बीएड उत्तीर्ण दिनांक पहावी.शिक्षक सोसायटी औरंगाबाद चे वीस वर्षांपासून नियमित हप्ते भरते एकमेव केस असल्याने पती अपंग बेरोजगार जी आर नुसार मयततरी एक चेक बाकीस दिले तसे द्यावा.इथून पुढील हिशेबाने नंतर दोन मुलांना विभागून द्यावे.वारस दोन अपत्य टाकू द्या.नंतर भांडायला लावू नये.दैघे नोकरी तर दोन अनुकंपा त लागतील यांना पेन्शन वर भाकरतरीमिळूद्या आणि एक सक्षम तोच घेईल पेक्षा ए ग्रेड वर शिक्षणसेवक सारखे पगार देत दोन्ही लेकरं अनुकंपात घ्यावे.जोडीदार व अपत्य वेगळी यादी अनुकंपा साठी हवी.विधवांना जीपीएस फोटो पहा.शाळेत येऊन जा नको वाहने ना सुरक्षा.मुअ ना पंधरा दिवस रजा.विशेष अपत्य तर अठरापेक्षा मोठा जोडीदार तरी खेळांसाठी रजा द्या.विधवांना व अपंग जोडीदार तर मयततरीरजानाही.मुलांच्या वार्षिक परीक्षेपुरत्या रजा द्या मी शाळेत त्यांचे दोन्ही पाय तीन तास बसलेकी सुजून यायचे दोन चकरा माराव्या तर पाचशे रुपये खर्च रोज कुठून करणार..एका पगारावर घर आयकर भरतो.पूरृणमाफ हवा.व्यवसायकर नको.वाहन लाभ द्यावे.वीस हजारांचे गणवेष पती व दोन्ही लेकरांच्या इच्छेने बेटी बचाव बेटी पढाओ बेटेने किधर जाओ म्हणून आमच्या हिरकणी धाडसाला छत्रपतींसारखा न्याय देणार्यांचे खूप आभार आमचे कुटुंब जगले म्हणून मोफत वाटले सातारा तांडा पहिली महिला प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून.पण आधार कार्ड साठी जे लेकरं पालक मयत अनाथ एकलचेमुलं जगायचा प्रश्न ते सुट्टी त सापडेना एकच मुलगा राहिला माझा..बाकी सारे अपंग कर्मचारी.. पदोन्नती त पुढं वयानं शिक्षण अनुभव टक्के सह लहान.जिल्हा बदली वाले सिटी अलाउन्ससह शहरात दोघे एक तपानंतर बदली पात्र पण सिनियरिटी लहान.अहोरात्र जागतोय सुट्टी तही घर व शाळा दोन कुटुंब जगवतो जगवुद्या.महिलाही कुटुंब प्रमुख पिता मातृहदयी दोन्ही अपत्य जन्म व माझी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही घाटी औरंगाबाद ची सेल्फ प्रमोटर केस.सगळे शासकीय प्रमाणपत्रे ए ग्रेड आजवरचे नवोदय शिष्यवृत्ती दहावी माझ्या सारखे संस्कृतला शंभर पैकी शंभर गुण धारक विद्यार्थी.पाहून एक जादा वेतनवाढ अवश्य द्यावी.व डीएड वर नोकरी शासकीय चे प्रमाणपत्र पाहून भाषा सूट मिळावी .

    ReplyDelete
  2. दहावी बारावी ऐच्छिक विषय आहे.जुनेशिक्षक सातवी पास वर लागायचे, बेसिक यावे साठी मराठी हिंदी होते.उर्दू पाली संगीत संस्कृत असे आजही जिपशाळांतच ऐच्छिकभाषांची सक्ती सूट का.. विधवांना नेट सेट पीएचडी एम ए संस्कृत तसे एम ए एज्युकेशन दोन्ही शाळेत नाही जिपला समान विषय मोजावे अर्थशास्त्र ही आणि विधवांना फीसूट द्यावी.शासकीय बीएड प्रशिक्षण रजा करत पूर्ण पगार द्यावा लाखोंत एखादी महिला गुणी ती सीईटी ने पात्र होते तेव्हाच शाळेचे लेकरं गुणवंत आहेत.जोडीदार मोठा की वर्षानुवर्षे तालुके बदलून प्रतिनियुक्ती चालते.हेही घर जगवा.मो.9730343398लता कोलते पाथ्रीकर.अपंग बेरोजगार पती ची विधवा शिक्षिका पत्नी प्राथमिक पदवीधर शिक्षिका सामाजिक शास्त्र प्रभारी मुख्याध्यापिका जिपप्राशा सातारा तांडा केंद्र सातारा ता जि औरंगाबाद,छत्रपती संभाजीनगर.

    ReplyDelete
  3. अपंगांना व संवर्ग एक ला मिळते घराजवळ शाळा तीसकिमीआत पती पत्नी मेळा ते अवघड क्षेत्रात जातीलचका..तर फक्त अपंग बेरोजगार जोडीदार असे माझ्यासारखे व गरोदर किंवा स्तनदा माता-दोन वर्षे पेक्षा बाळ लहान अशा महिला,खाजगी संस्थेतून जिपत आलेले एकल बांधव जे एका पगारावर चलो बॉंड्रीवर म्हणतसहाजीव जगवतात स्वतः जोडीदार दोन अपत्य व पालक.हाडं खिळखिळी खिसा खुळखुळा.अशांचीच अपघात ते मयत पर्यंतची अपंग जोडीदार साठी ते तीन जिल्हा बॉंड्रीवरील टोकांच्या शाळाते अवघड क्षेत्रच होते.सलग सेवा आहे तो कितिही असो तो काळ मोजावा.अपंग व पती पत्नी साठी ते सुगमच.अलिकडचे गावं अवघड क्षेत्रातील टाकलेत सोयीने..जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे..तर अवघड क्षेत्रातील नोकरी अनुभव आहे का यात अपंग बेरोजगार जोडीदार, गरोदर स्तनदा माता रेकॉर्ड त्या काळाचे आहेका मा घाटीचे त्रिस्तरीय अपंग प्रमाणपत्र पहा.युनिक डिसेबलिटी कार्ड पहा अपंग कर्मचारी अपंग मुलं टाकता बालसंगोपन रजेत गंभीर आजारी पत्नी तर शिक्षक पतीलारजाआहे पण अपघाताने दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून व बेरोजगार आजारी तर पत्नी ती का विसरते.. फक्त कर्मचारी लाच किंमत..बेकारला साधी शिलाई मशीन नाही मिळाले..हेही पती पत्नी आहेत होते.इथं समजून माहिती घ्यावी. कर्मचार्याचा अपंग बेरोजगार जोडीदार 2019ला आला जी आर मध्ये.अपंग अधिनियम 2016यात मतिमंद शब्द 2020ला आला पण बदली पदोन्नती कर्मचारी मयत जोडीदार माहिती यात मतिमंद मुलांचे पालक आधी आहे पण अपंग बेरोजगार जोडीदार जिवंत मयत माजी सैनिक आई-वडील जिवंत मयत सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय आहे का दोन अपत्य शिकणारी अवलंबून आहेत की कमवते आधार पॅनसह जोडा हे टाकावे.शिक्षक नावे क्वचितच जुळतात विद्यार्थी यांचे काय..एम एस सी आय टी सह पहावे.. विधवांना अपंग कर्मचारी सारखे वेळेत सूट वाहनभत्ते व्यवसायकर रोड टॅक्स सूट फीससूट पदोन्नती स्वतंत्र यादी सवलत द्यावी.पतीपत्नी तसे विधवांचे लेकरं अनुकंपात तीस किमी आत सेवेत घ्यावे.निदान रेशनकार्ड वर औषधी व धान्य स्वस्त मिळावे उत्पन्न अट नको.जनगणनासूट कमी काम जादा वेतन मतदान ड्युटी सूट नका देऊ.आजवर एकही मतदान ड्युटी सूट नाही घेतलेली मी तान्हे लेकरं तेव्हाही केलेली आहे.जनगणना फुलंब्री ची मागासवर्गीय परिसर एकही फॉर्म न चुकता केली.त्याचे प्रशंसा प्रमाणपत्र अजूनही नाही मिळाले.रजेत बरीच संख्या दिसते मात्र.आता विधवांना सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय यांना मुक्कामी जावे लागते मतदान ड्युटी साठी सामानासह ..तर तिथं सूट देत शाळेत बोलवा चालेल.समजूनघ्यावे.पन्नाशीत 80%जास्त अपंग सेवानिवृत्ती व 55वयात 40%-80%असलेले असाही विचार वाचला कुठं तरी.. अपघाताने गंभीर आजारी किंवा नैसर्गिक अपंग दुर्मिळ कमी आहेत.90%जास्त मतिमंद तरी चार सहा मेडल्स राष्ट्रीय ला घेणारे खूप शिक्षक पाल्य आहेत.तेही आधार जोडावे पालक आधार पॅन सह.विधवांना मयत व वार्षिक परीक्षेपुरत्या दहावी बारावी कोर्ट केस लायसन्स भाषासूट अशातरी विशेष रजा द्या व आजार पणातही.तसेच तीन महिने प्रसूती रजा जोडुन दोन सिझेरियन व दुसऱ्या वेळी त्यातच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तर चाळीसेक टाके आहेत सहा महिने सुधरत नाही शाकाहारी आहे.तर प्रसुती रजेस जोडून 45दिवस किंवा तीन महिनेकुटुंब नियोजन रजा त्या महिलेस मिळावी.मला नाही मिळाले.उलट दोन अपत्य नंतर अबॉर्शन रजा देते शासन.दोन घरभाडे तसे.दूध पाजून जगवली लेक म्हणून केंद्रीय सीईटी दिली.दोघंनोकरीवाले झोके होते शाळेतपण एकलीची कुणी तरी वारले तो एक दिवस नाही चालला शाळेत.. सीईटी माहिती फॉर्म वर स्पष्ट दोन वर्षं शिक्षक पदावर काम अनुभव आहे का हे आहे माझी सात महिने सेवा होती.. दहावी बारावी वर नोकरी वाले वस्तीशाळा शिक्षक बांधवांची आरंभापासून सेवा मोजत आहेत पण डीएड वर नोकरी तर केंद्र प्रमुख पदोन्नती आदी ठिकाणी शिक्षणसेवक कालावधी वगळून का..आरंभपासून सलग सेवा मोजा .

    ReplyDelete
  4. कला क्रीडा वालेही पदवीधर एकल एक शिक्षक दरवेळी दूर फेकला जातो बदलीत हे विशेष तेथेच सिटी अलाउन्ससह शहरात वीस वर्षे ही राहतात पण बीएड भिन्न विषय तरी जसं आम्ही दहावी नंतर गणित विज्ञान नसलं तरी शिकवतो डीएड ला होते म्हणून तसे तीन भाषा ही होत्या डीएड ला तर पगार बहुधा माध्यमिक सारखा तर कला क्रीडा वालेही टोकाला ही चित्रकार खेळाडू गुणवंत विद्यार्थी आहेतच युडायस नुसार हेही पदवीधर सह बदली पात्र असावे व जमेल ते विषय सहा ते आठ चे शिकवू दृयावे.शाव्यसमिती यातही दोन अपत्य असलेले आधार कार्ड धारक नियमित शाळेत त्या सर्व जातींच्या लेकरांचे पालक घ्यावे.शापैआताई अंगणवाडी ताई यांचीही अपत्य माहिती घेत स्थानिक विधवा अपंग बेरोजगार पती ची विधवा पेन्शन न घेणार्या निराधार ओपन इ.आमच्यासारखे सगळीकडून लाभात सुटून जाणार्याविधवा शासकीय सेवेत घ्यावे.सर्व विद्यार्थी यांना गणवेष मोफत असावे.शिक्षण मोफत शिष्यवृत्ती का देता..सर्व जातींचे गुणी दोन अपत्य वाले किंवा एका वर्षीएकुणपैकीजास्त टक्के ते मूल एकच प्रकारची दोनच अपत्य शिष्यवृत्ती घेत आहेत असे हमीपत्र घेत त्या गुणी लेकरांना लाभ द्यावे.माजीसैनिक विधवांना पेन्शन लवकर मिळावी.मृत्यू प्रमाणपत्र वर पत्नी नाते नाव आहे कदाचित वडील मिल्ट्रीत तेव्हा विवाह नसेल झालेला..आता माजी सैनिक पणतू नोकरीत लागताहेत शिक्षक बदलीत पाल्य नातू आहेका यावे तर अमृतमहोत्सवी वर्षात आहोत स्वातंत्र्य काळी हे आणखी पटेल.

    ReplyDelete
  5. 🙏काव्यलता🙏
    बदल नियम आयुष्याचा
    जुने चांगले नवेही भले
    सुखदुःखात साथ असूद्या
    नाते कार्यालयापलिकडले.
    आपल्यावेळीही बसला असेल
    दोन वर्षांतही वैध अवैध खो,
    कला क्रीडा स्थिर वीसवर्षहीजोडी
    एक पदवीधर विस्थापितही गो.
    जिल्हाबदलीसुगमक्षेत्रदशक
    सेवाएका शाळेत नाही, नियम
    शिरोडी खुर्द की सातारा तांडा
    एकलटोक जोडीशहरी कार्य भ्रम.
    कळतात जीआर अनुभव तसे,
    अपंगबेरोजगारजोडीदार
    तीनजिल्हाबॉंड्रीटोकास
    ती अवघड क्षेत्रात सेवा असे.
    बदलतात दिवस ,राहती आठवणी
    अपंग बेकार,च्या विधवाप्रभारी
    शिक्षिका,अल्प हिरकणी.
    भरती कर, सिंगल पॅरेंट
    सिंगल एम्प्लाय सुपर नारी
    शासकीयचे जन्म शिक्षण
    विद्यार्थीशासकीय बड़े अधिकारी.
    जिप असो की खाजगी
    शिक्षक आयुष्य घडवी,तुडवी.
    आपणांस भेटलेले गुरू आठवत
    रडून न लढून समस्या बडवी.
    नवीन व्यक्तींशी जुळेल मैत्री
    स्वभाव भिन्न प्रत्येकाचे
    चांगले असेल भविष्य आणखी
    समजून पुढे चालायचे.
    चुकले दरवेळी नवीन काही
    सुधारणाही आपणच करू
    परिपूर्ण न कुणी परंतु
    प्रत्येकातले छान स्वीकारू.
    एक कुटुंब जगवताना
    दुसर्याची आबाळ कसरत होई
    घरशाळेचे लेकरं आपलेच
    दिल्या घरी सुखी राही.
    -लता कोलते पाथ्रीकर औरंगाबाद.🙏

    ReplyDelete
  6. 🙏काव्यलता🙏
    मी शिक्षक तुम्ही शिक्षक
    आम्ही तेवढे खरे तुम्ही
    रात्र रात्र परेशान आधार कार्डला
    जबाबदारीपदांसहजाणतो आम्ही.
    प्रभारीचे तर सारेच लेकरं
    घरचे दोन तेवढेच प्रिय
    पण एकावेळी दोन इयत्तांत
    दोन शाळांत करावं काय?
    कळला उपाय आता यावर
    जसे बीएड एम एड ला शिक्षक
    शाळेतपगार नियमित वेतनवाढ,
    शिष्यवृत्तीपदवीपदोन्नतीघबाड.
    रेकॉर्ड खरं दोन्ही ठिकाणचं
    विद्यावेतन परिश्रमिक आदी
    शासकीयवाली वंचित फक्त
    प्रतिनियुक्तीशेकडोग्राह्यअसती.
    तसा निघेल उपाय काही
    खर्यास दोषी ठरवून कायम
    रजापगारपदोन्नतीत तिसरे
    प्रभारी काम करत राही कायम!
    -लता कोलते पाथ्रीकर औरंगाबाद.🙏

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.