मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्ती बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय

 मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्ती बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी विविध याचीकांमध्ये माननीय उच्च न्यायालयाने वेळोवेळी नोंदवलेल्या निरीक्षणास व दिलेल्या निर्देशांना अनुसरून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती बाबतच्या प्रस्तावावर करावयाच्या कार्यवाही बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


मनी उच्च न्यायालयाने अनुकंपा तत्व नियुक्ती देणे ही मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात येणारी कृती असून शिक्षणाधिकारी यांचे कडून शासन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावून प्रस्तावनाकारले जात असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे मूळ ता मंजूर असते केवळ त्या पदावर या तत्त्वांतर्गत नियुक्ती करावयाची असल्यामुळे ही नवीन पदभरती नसते किंवा ही नवीन पद निर्मिती देखील नसते असेही निरीक्षण माननीय न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे या नियुक्तीवर कोणत्याही पदभरती बंदीचा अथवा आकृतीबंध निश्चित नसल्याचा प्रभाव पडत नाही असे मत माननीय उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच यापुढे अशाप्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नकार याविरुद्ध याचिका माननीय न्यायालयासमोर आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंग विषय क** कारवाई तसेच माननीय न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेतही माननीय न्यायालयाने दिले आहेत त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने उपयुक्त विषयांवर दिलेल्या निर्देशास अनुसरून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्ती बाबतच्या प्रस्तावांवर निर्णय घेताना खालील बाबींनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.

1) अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने व अनुकंपा तत्वावरील पद भरती ही नवीन भरती नसल्याने तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना संबंधित पद नव्याने निर्माण केले जात नसल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा प्रस्तावावर कार्यवाही करताना पदभरती बंदी व आकृतीबंध निश्चित नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव अमान्य न करता त्यावर गुणवत्तेनुसार कार्यवाही करावी.

2) अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना नियुक्ती द्यावयाच्या उमेदवार कर्मचारी ज्या पदावर कार्यरत होतात त्या पदावर नियुक्तीस पात्र ठरत नसल्यास त्यापेक्षा खालच्या वर्गाच्या इतर पदावर त्यास अनुकंपा तत्व अंतर्गत समायोजित करावे यासाठी सक्षम प्राधिकारी अशी पदे उपलब्ध आहेत किंवा कसे याची शहानिशा करून या उमेदवारांना पात्र उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट करतील.

3) माननीय उच्च न्यायालयाने नमूद केल्यानुसार अति विलंबाने साधारणतः दहा वर्षानंतर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती बाबत मागणीचे प्रस्ताव अति विलंबाच्या कारणास्तव सदर कुटुंबास याची आवश्यकता नसल्याचे व अनुकंपा तत्वाचा हेतू साध्य होत नसल्याच्या कारणास्तव अमान्य करता येईल.

4) उपरोक्त सूचना या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या अनुषंगाने दाखल विविध न्यायालयीन प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांना अनुसरून देण्यात येत असल्याने याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी व माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी यासंदर्भात मान्य न्यायालयाच्या आदेशांचा अवमान झाल्यास त्या संबंधित अधिकारी प्राधिकारी जबाबदार राहील.

एखादी व्यवस्थापन अनुकंप तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराचा न्याय हक्क डावलीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी.


वरील प्रमाणे अनुकंपा नियुक्ती विषयी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सुस्पष्ट असे निर्देश दिले आहेत.




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.