बदल्या संदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याबाबत आजचा ग्रामविकास विभागाचा आदेश

 बदल्या संदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याबाबत आजचा ग्रामविकास विभागाचा आदेश.


आज दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्या संदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटार करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. आंतरिकला बदलीसाठी कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात व अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विभागीय आयुक्तांनी प्रकरण परत ते तक्रारीची शहानिशा करून 30 दिवसांत त निर्णय घ्यावा अशी स्पष्ट तरतूद दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 19 मध्ये नमूद आहे त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

सन 2022 मध्ये झालेला अंतर जिल्हा बदली संदर्भात कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीबाबत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींशी संबंधित वस्तुस्थिती सदर कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदे कडून मागवून घ्यावी.

सदर बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय जेष्ठतेनुसार विनंती प्रमाणे करण्यात आली असून सदर प्रणाली वन्सिस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेली आहे त्यामुळे सदर तक्रार कर्जाच्या अनुषंगाने बिनसिस आयटी सर्विस प्राइवेट लिमिटेड यांच्याकडे ई-मेलवर खालील स्वरूपात माहिती सादर करून अभिप्राय प्राप्त करून घ्यावे.

शिक्षकाचे नाव, मोबाईल क्रमांक, शालार्थ क्रमांक, कार्यरत जिल्हा परिषद, नियुक्तीचा प्रवर्ग, ज्या प्रवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो प्रवर्ग, जात प्रवर्ग, ज्या संवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो संवर्ग, (ना हरकत प्रमाणपत्र धारक/विशेष संवर्ग शिक्षक भाग एक/विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन/सर्वसाधारण संवर्ग) निवडलेल्या जिल्ह्यांचे पर्याय, तक्रारीचा थोडक्यात तपशील.


सदर तक्रारीबाबत संबंधित जिल्हा परिषदे कडून प्राप्त वस्तू स्थिती तसेच विन्सिस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील अभिप्राय विचारात घेऊन प्रकरण परतवे तक्रारीची शानिशा करून संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांनी निर्णय घ्यावा.

आंतरजिल्हा बदली संदर्भात कर्मचाऱ्यांची काही तक्रार असल्यास अशी तक्रार सदर कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद ज्या विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात आहे त्याच विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत सर्व संबंधित शिक्षकांना कळविण्यात यावे.

तसेच असा तक्रार अर्ज अन्य विभागीय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाल्यास सदर तक्रार अर्ज संबंधित कर्मचारी सद्यस्थितीत बदली होण्यापूर्वी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद ज्या विभागीय आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात आहे त्या विभागीय आयुक्तांकडे पुढील आवश्यक त्या निर्णयासाठी हस्तांतरित करावा व तसेच संबंधित कर्मचाऱ्यास कळवावे.

शासनाच्या संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे अंतर जिल्हा बदली संदर्भात प्राप्त तक्रारींची प्रकरण परत्वे शहानिशा करून विहित कालावधीत निर्णय घ्यावा ही विनंती.


वरील प्रमाणे निर्देश सर्व विभागीय आयुक्त यांना आज दिनांक सात सप्टेंबर 2022 रोजी च्या शासन परिपत्रक अन्वय देण्यात आले आहेत.वरील ग्रामविकास विभागाचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.