राष्ट्रपुरुष,थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन सुट्टीच्या दिवशी आल्यास त्या अगोदरच्या दिवशी साजरे करणे बाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश

 राष्ट्रपुरुष,थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करणे बाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश.


दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राष्ट्रपुरुष ण थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरी करणे बाबत पुढील प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.


सन 2022 मध्ये राष्ट्रपुरुष थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम मंत्रालय व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी येत असेल तर ते कार्यक्रम त्या त्या दिवशी साजरे करण्यात यावेत.

राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जयंती दिनी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाच्या अतिरिक्त असलेल्या सर्व डिस्प्ले बोर्डवर संबंधित राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची माहिती संपूर्ण दिवसभर प्रदर्शित करण्यात यावी. 

राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे जयंतीदिनी सर्व शाळा महाविद्यालय येथे जयंती साजरी करताना संबंधित राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या अनमोल कार्याचे सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने व्याख्याने निबंध स्पर्धा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम शाळा तसेच महाविद्यालय येथे आयोजित करण्यात यावेत जेणेकरून भावी पिढीला राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे देशासाठी केलेल्या महान कार्याची माहिती होईल. तसेच जयंती दिन सुट्टीच्या दिवशी येत असल्यास शाळा महाविद्यालय यांनी राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्याबाबत व्याख्याने निबंध स्पर्धा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सुट्टीच्या आदल्या दिवशी आयोजित करणे उचित राहील. 

विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त महानगरपालिका यांनी त्यांच्या विभागातील जिल्ह्यातील महानगरपालिकेतील सर्व शाळा महाविद्यालय सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्यांच्या अंमलबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करावी. 

वरील प्रमाणे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सदर परिपत्रकाद्वारे निर्गमित केले आहेत. 



वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.