"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" उपक्रम राबवून बाबत शासन निर्णय.

 "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" उपक्रम राबवून बाबत शासन निर्णय.

दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान घ्यावयाची कार्यक्रम.


महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 30 जून 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम राबवण्याबाबत पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे.


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणारे या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे सदर महोत्सवाच्या आखणी नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली धोरण समिती तसेच मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखाली कोर समिती व माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती व माननीय पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी च्या कोवर समितीमधील बैठकीत समितीच्या मान्यवर सदस्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात विविध सूचना केल्या होत्या. या कालावधीत राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तालुकास्तरावर व ग्राम स्तरावर स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या गौरवशाली परवानिमित्त बारा मार्च 2019 ते दिनांक 15 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्यांना कळविले आहे त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत शासन निर्णय शासन परिपत्रक शासनपत्राद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. जनतेच्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2022 दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राज्यात स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. स्वराज्य महोत्सव अंतर्गत राज्यस्तर जिल्हास्तर तालुकास्तर व ग्रामस्थ आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांचे स्वरूप परिशिष्ट अ ब कवड मध्ये निश्चित केलेले आहेत त्यानुसार स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम उपक्रमाचे यशस्वी विचार जास्तीत जास्त जनसहभागातून आयोजन करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने निर्गमित केले गेले आहेत.वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.