FYJC to FYJC & FYJC to SYJC Student Transfer Module संगणकीय प्रणाली दिनांक २२/०६/२०२६ पासून कार्यान्वित

 FYJC to FYJC & FYJC to SYJC Student Transfer Module यासाठी संगणकीय प्रणाली दिनांक २२/०६/२०२६ पासून कार्यान्वित करणे बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक एकोणवीस जून 2026 रोजी  पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.


जा.क्र.शिसं/उमा/विद्याशाखा/११वीप्रवेश/अ-१/२०२६-२७/

दिनांक १९/०६/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

३. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)

विषयः- इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७.

FYJC to FYJC & FYJC to SYJC Student Transfer Module यासाठी संगणकीय प्रणाली दिनांक २२/०६/२०२६ पासून कार्यान्वित करणे बाबत.

संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक २७/०४/२०२६ रोजीचा शासन निर्णय.

२. दिनांक १६/०६/२०२६ रोजीचा ई-मेल संदेश.

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन २०२५-२६ मध्ये झालेल्या इयत्ता ११ वी मध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात येणा-या संगणकीय प्रणालीवर खालील प्रमाणे बदल करण्यात यावेत.

१. इयत्ता ११ वी मधून इयत्ता १२ वी मध्ये प्रवेश घेताना माध्यम, विषय आिण शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

२. इयत्ता ११ वी मधून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेताना माध्यम, विषय आिण शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

३. राज्य मंडळा व्यतीरिक्त इतर मंडळातून प्रवेश, परराज्यातून येणा-या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करावयाचा असल्यास इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये आणि इयत्ता ११ वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी मध्ये राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

४. शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक २७/०४/२०२६ रोजीचा शासन निर्णयामध्ये नमूद १४.८ व १८ नुसार पालकांची बदली झाल्यास शासनाच्या बदली आदेशाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

५. या व्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास अशा विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदल करावयाचा असल्यास ठोस पुरव्यानिशी विभागीय शिक्षण उपसंचालक संचालनालयास प्रस्ताव सादर करतील. विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत कनिष्ठ महाविद्यालय बदलविण्याचा ऑनलाईन अर्ज शिकत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून करतील त्यावेळी पुरावे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

६. उपरोक्त क्रमांक १ ते ५ प्रमाणे बदल करावयाचा ऑनलाईन प्रस्ताव भरताना प्रत्येकवेळी प्रत्येक विद्यार्थ्याने बदलाचे कारण नमूद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

वरील प्रमाणे बदला करीता इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दिनांक २२/०६/२०२६रोजी सकाळी १०.०० वा. पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी विद्यार्थी मार्गदर्शक सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरुन संबंधितांना कळविण्यात यावे.

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 19-06-2026 16:14:08


(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत माहितीस्तव सविनय सादर,

मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००१.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.