"आंतरराष्ट्रीय योग दिन" आयोजनाबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 18 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्र. शिसंमा/संकीर्ण/२०२६/ए-१/विद्या शाखा /
महत्त्वाचे/कालमर्यादित/ई-मेलव्दारे
प्रति,
दि.१८.०६.२०२६
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी वृन्हमुंबई महानगरपालिका
५) प्रशासकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका
६) प्रशासन अधिकारी, म.न.पा.सर्व
विषय :- "आंतरराष्ट्रीय योग दिन" आयोजनाबाबत..
संदर्भ :
- १. मा. अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र D.O.No. १३-२/२०२६-८९.४ दि.२९/०५/२०२६
२. मा. सहसचिव, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र DO No: W-१२०१७/२/२०२६- IEC दि.१८/०५/२०२६.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/कला व क्रीडा/आ/सन २०२६-२७/१९४०४४९ दि.०४/०६/२०२६.
४. शिक्षा मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक १८.०६.२०२६ चा प्राप्त संदेश.
उपरोक्त संदर्भानुसार सूचित करण्यात येते की, संदर्भ क्रमांक ४ च्या आदेशान्वये शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षीची संकल्पना निरोगी वृध्दत्त्वासाठी योग' (Yoga for Healthy Aging) अशी आहे. हा दिवस रविवारी येत असल्याने, शाळांमधील जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. २१ जून, २०२६ रोजी माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या योग संगम कार्यक्रमांसाठी देशभरातून नोंदणी सुलभ करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने योग संगम पोर्टल २०२६ (https://yoga.avush.gov.in/yoga-sangam) सुरु केले आहे. गेल्या वर्षी यात ८ कोटींहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
तसेच यापूर्वी कळवलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि सहभागाची माहिती २ दिवसांच्या आत पोर्टलवर तसेच केंद्र शासनाने दिलेल्या लिंकवर नोंदवावी.
उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे २१ जून, २०२६ 'आंतरराष्ट्रीय योग दिवस यावर्षीची संकल्पना निरोगी वृध्दत्त्वासाठी योग' (Yoga for Healthy Aging) या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी यांनी सहभागी होणेबाबत सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) यांनी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक यांना संचालनालय स्तरावरून सूचित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी केंद्र शासनाने दिलेल्या आदेशान्वये २१ जून, २०२६ 'आंतरराष्ट्रीय योग दिवस यावर्षीची संकल्पना निरोगी वृध्दत्त्वासाठी योग' (Yoga for Healthy Aging) बाबतची कार्यवाही करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सूचित करावे.
सोबत लिंक :-
https://yoga.avush.gov.in/yoga-sangam
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 18-06-2026 17:35:10
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१.
"आंतरराष्ट्रीय योग दिन" आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या संचालकांनी दिनांक 4 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
जा.क्र. राशैसंप्रपम/कलाक्रीडा/IDY आ./सन २०२६-२७/
दि. ०४/०६/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद, सर्व
५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), बृहन्मुंबई
६. प्रशासन अधिकारी. (म.न.पा/न.पा) सर्व,
विषय :- "आंतरराष्ट्रीय योग दिन" आयोजनाबाबत...
संदर्भ :-
१. मा. अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र D.O.N०. १३-२/२०२६-९९.४ दि. २९.०५.२०२६
२. मा. सहसचिव, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र DO No: W- १२०१७/२/२०२६- IEC दि. १८.०५.२०२६
उपरोक्त विषय व संदर्भानुसार आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेमार्फत दिनांक २१ जून, २०२६ रोजी होणाऱ्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) देशव्यापी आयोजनाचे समन्वय करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, योगाला दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून अंगीकारण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रचार करण्यासाठी, आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ शी संबंधित प्राथमिक क्रिएटिव्ह्ज (logos, बॅकड्रॉप्स संदर्भ साहित्य, आणि व्हिडिओ, बॅनर्स व इन्फोग्राफिक्स यांसारखे सोशल मीडिया साहित्य) असलेली एक गूगल ड्राईव्ह लिंक तयार करून शेअर केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी हे साहित्य आपल्या अधिनस्त सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावे. हे साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे:
https://drive.google.com/drive/folders/liRmU2qPHn0mjxGQyUYPIX3BtloBliMe
आंतरराष्ट्रीय योग दिन या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी यांनी सहभागी होणेबाबत सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य/योजना) यांनी आपले अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपले स्तरावरून सूचित करावे. तसेच सोबत दिलेल्या लिंकमध्ये माहिती प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) यांनी समन्वयाने भरावी.
सोबत लिंक -
https://docs.google.com/spreadsheets/d/1LTLYPNJRoZ95eKW1vRLkYbvetkz3UvoxWiWPVjWgwI/edit?usp=sharing
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-०१.
३. मा.प्रकल्प संचालक, मप्राशिप, जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई.
प्रत माहिती तथा कार्यवाहीस्तव -
१. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्य. व उच्च माध्य/योजना), शिक्षण संचालनालय, पुणे
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनाचे प्रकार मार्गदर्शक पुस्तिका, योगासनाचे फायदे.
योगासनाचे प्रकार पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
योगासनांचे दहा फायदे.
भारत सरकारने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस संदर्भातील सामान्य योग अभ्यासक्रम पुस्तिका प्रकाशित केली आहेत ती पुढीलप्रमाणे.
वरील संपूर्ण पुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏









0 Comments