अनुकंपा तत्वावर नोकरी हा अधिकार नाही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय.

 अनुकंपा तत्वावर नोकरी हा अधिकार नाही! उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. 


कर्मचारी सेवेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर सहानुभूती म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. 

परंतु ही अनुकंपा नोकरी हा अधिकार नाही त्यामुळे पीडितांनी ही नोकरी मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.  अशा प्रकारच्या नोकरीसाठी मनात येईल तेव्हा दावा करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. 

हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील रवी वाटकर यांच्याशी संबंधित आहे.  वाटकर यांनी अनुकंपा नोकरी मिळावी याकरता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु त्यांनी या नोकरीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही केली नसल्याचे आढळून आल्यामुळे न्यायालयाने ही बाब स्पष्ट करून त्यांना दिलासा नाकारला आहे. सेवेदरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये त्यांना लगेच आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने अनुकंपा नोकरीचा लाभ देण्यात येतो ही एक कल्याणकारी योजना आहे परंतु या नोकरीवर कुणीही वारसा हक्क म्हणून दावा करू शकत नाही. पिढी त्यांना धोरणाच्या विरोधात जाऊन नोकरी दिली जाऊ शकत नाही नोकरीची गरज असणाऱ्यांनी तातडीने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले आहे. 


वाटकर यांचे वडील वरोरा नगरपरिषदेत शिपाई होते त्यांचा 18 मे 2000 रोजी मृत्यू झाला त्यानंतर अनुकंपा नोकरीसाठी त्यांच्या आईचा वयाच्या 39 व्या वर्षी प्रतीक्षा यादी समावेश करण्यात आला होता परंतु त्यांना वयाच्या 45 व्या वर्षापर्यंत नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्यांचे नाव प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. 

वाटकर 3 ऑक्टोबर 2012 रोजी तज्ञान झाले परंतु त्यांनी नोकरीसाठी तातडीने प्रयत्न केले नाही त्यांनी 16 फेब्रुवारी 2016 रोजी नोकरीसाठी अर्ज केला तसेच त्यावर निर्णय घेण्यात आला नाही म्हणून 2018 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


वरील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार केला असता अनुकंपा तत्त्वावर जर कुटुंबीयांना नोकरी हवी असेल तर योग्य वेळी संबंधित कार्यालयात पाठपुरावा करून ती मिळवावी लागेल असे स्पष्ट होते.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.