सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 19 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६
दिनांक- १९/६/२०२६
प्रति,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
विषय- सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत
संदर्भ- आपले पत्र क्र.११७०/दि.१८/६/२०२६
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळसेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षणसेवक सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत अशा शिक्षणसेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेबाबत विनंती केलेली आहे
संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की,
१/- मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषय निहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुस-या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल.
२/- पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल. त्यांना पदावनत करता येणार नाही.
३/ याव्यतिरिक्तही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षक पदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षक पदी कार्यरत ठेवता येईल.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य पुणे-१
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
२. मा.आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments