शिक्षक भरती MPSC कडे जाण्याची दाट शक्यता.

 शिक्षक भरती MPSC कडे जाण्याची दाट शक्यता.


शिक्षक भरती करताना सीईटी घोटाळा, आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये झालेला सावळा गोंधळ यामुळे यानंतरची शिक्षक भरती एमपीएससी कडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाकडून फाईल देखील पाठवण्यात आलेली आहे. यावर एमपीएससीचा अभिप्राय घेण्याचे देखील सुचवलेले आहे.



शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी शिक्षणायुक्त शिक्षण सचिव व इतर प्रशासकीय अधिकारी यांची यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक असल्याचे देखील कळते.

अर्थात यासाठी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी घेतली जाईल व मंजुरीनंतरच शिक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडे वर्ग होऊ शकते.

यासाठी सध्या तरी महाराष्ट्रात संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही परंतु लवकरच मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर सदरचा निर्णय होऊ शकतो.

शिक्षक भरती MPSC कडे जाण्याची दाट शक्यता. सामान्य प्रशासन (GAD) विभागाकडून शिक्षण विभागाला फाईल आलेली असून यावर MPSC आयोगाचा अभिप्राय घेण्याचे सुचविले आहे. आयोगाने शिक्षक भरती घेण्यास होकार दर्शविला असल्याची माहिती आहे. याबाबत आज शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त वर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आहे. सर्व मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव कॅबीनेट बैठकीत मंजुरीसाठी जाईल त्यानंतरच MPSC द्वारे शिक्षक भरती घेण्याचा मार्ग मोकळा होईल.


या मागणीसाठी MPSC समन्वय समिती,  शिक्षण विभाग, GAD तसेच मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करीत आहे, हा निर्णय झाल्यास शिक्षक भरती भ्रष्टाचार मुक्त विना विलंब पार पडू शकेल तसेच शक्यता असेल इतर पदांच्या मागणी पत्राप्रमाणे दरवर्षी शिक्षक भरतीतील पदे भरली जातील. 


शिक्षक भरती जर एमपीएससी कडून झाली तर कोणकोणत्या बाबी घडतील.

दरवर्षी इतर पदांप्रमाणे शिक्षक पदांची जाहिरात देखील एमपीएससी कडून निघेल.

शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक सीईटी एमपीएससी कडूनच घेतली जाईल.

एमपीएससी इतर पदे जशी वेळापत्रकानुसार भरते त्याचप्रमाणे शिक्षकांची पदे देखील वेळापत्रकानुसार भरली जातील.

एमपीएससी दरवर्षी जिल्हा परिषदा व शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांचा अहवाल मागवून त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करेल.

एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षण प्रमाणे शिक्षक भरती परीक्षा ह्या व्यवस्थित नियमित काळजीपूर्वक होऊ शकतील.


अर्थात ही शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या डीएड बीएड उत्तीर्ण भावी शिक्षकांसाठी आनंदाची बाब आहे.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

4 Comments

  1. केंद्र प्रमुख व गटशिक्सनाधीकारी व तत्सम पदे फक्त जी. प. शिक्षकासाठीच आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, काही पदे सरळ सेवा भरतीतून देखील भरली जातात.

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.