शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संबंधित महत्त्वाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे - शासन निर्णय.

 शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संबंधित महत्त्वाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे - शासन निर्णय.


राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने माननीय सुप्रीम कोर्टाच्या सुमोटो रिट पिटीशन क्रमांक 04/ 2020 आणि 06/2021 पनवे शाळाबाह्य विद्यार्थी व कोविड कालावधीत पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विषयक बाबींची माहिती राज्य शासनाकडून मागविली आहे. सुप्रीम कोर्टाची सोमोटो रेट पिटिशन क्रमांक  04/2020 आणि 06/2021 ची सुनावणीच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत तयार करण्यात येणार आहे, त्यासाठी राज्यस्तरावरून माहिती सादर करणे महत्त्वाचे आहे. उपरोक्त प्रमाणे सदर विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दिनांक 16 जुलै 2022 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे बैठक तिचे आयोजन करण्यात आले होते.

16 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने बैठकीत दिलेल्या आदेशानुसार व माननीय सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे शालाबाह्य आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे विद्यार्थ्यांच्या पालकांना याविषयी मार्गदर्शन करणे व प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यासंबंधी इतर कमी पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे.

परंतु जिल्हास्तरावरील संपूर्ण माहितीचे सल्ला संकलन करून त्याची केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे शाळाबाह विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे शाळाबाह्य आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे विद्यार्थ्यांच्या पालकांना याविषयी मार्गदर्शन करणे व प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंबंधी इतर कमी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.


शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संबंधित विषयावर जिल्ह्यातील शाळांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे राज्य स्तरावरून निर्गमित केलेल्या सूचनांच्या मूलबजावणी जिल्हा स्तरावर करण्याची जबाबदारी टोटल अधिकारी यांची राहील. जिल्हा निहाय नियुक्त केलेल्या नूडल अधिकारी त्यांचे नाव ईमेल आयडी मधून याची यादी प्रपत्र अ मध्ये देण्यात आली आहे.


प्रत्येक जिल्ह्यावर नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे संपर्क क्रमांक व ईमेल आयडी पुढील प्रमाणे.


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏







Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.