संयुक्त खात्यात निवृत्तीवेतन स्वीकारणाऱ्या राज्यसंवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला ओळख तपासणीतून सूट देणेबाबत शासन निर्णय.

 संयुक्त खात्यात निवृत्तीवेतन स्वीकारणाऱ्या राज्यसंवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला ओळख तपासणीतून सूट देणेबाबत शासन निर्णय. 


केंद्र शासनाच्या कर्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन विभागाच्या संदर्भातील दिनांक 15 मे 2020 च्या विज्ञापनान्वये कुटुंब निवृत्तीवेतन प्रधानाच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे. त्यामुळे ज्या प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेशामध्ये निवृत्तीवेतनधारकाच्या पती पत्नी यांच्या नावाने कुटुंब निवृत्ती वेतन देखील प्राधिकृत केले असेल आणि निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचे संयुक्त बँक खाते अस्तित्वात असेल अशा प्रकरणी निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकास प्रथम ओळख तपासणी करिता व्यक्तिशः हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही. केंद्र प्रमाणेच राज्यसंवर्गातील अखिल भारतीय सेवेतील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील प्रथम ओळख तपासणीसाठी व्यक्तिशः हजर राहण्यातून सूट देण्यासंदर्भात शासन निर्णय पुढीलप्रमाणे.


ज्या प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेशामध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या पती अथवा पत्नी यांचे नावे कुटुंब निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्यात आले असेल आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन धारका समवेत संयुक्त बँक खाते अस्तित्वात असेल अशा प्रकरणी निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करतेवेळी प्रथम ओळख तपासणी करतात कोषागार कार्यालयात व्यक्तिशः उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. अशावेळी निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर पती अथवा पत्नीने कुटुंबी निवृत्तीवेतन सुरू करण्यासाठी संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयाकडे त्याच्याकडे सोबत जोडलेल्या नमुना 12 अ मध्ये खालील कागदपत्रासह अर्ज करावा.

निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यूचा दाखला.

नामनिर्देशन नमुना.

मात्र ज्या प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेशात कुटुंब निवृत्तीवेतन पती पत्नी नावाने प्राधिकृत करण्यात आलेले नाही अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त बँक खात्यात जमा न होता ते निवृत्तीवेतनधारकाच्या एकट्याच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा केले जात होते त्याबाबतीत पूर्वीप्रमाणेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नमुना 12 मध्ये कोषागार अर्ज करावा लागेल तसेच ओळख तपासणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

यापुढे निवृत्तीवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे पाठवताना आहारन व संवितरण अधिकारी यांनी नमुना पाच या निवृत्तीवेतनधारकाच्या माहिती सोबत कुटुंब निवृत्तीवेतन धारकाची नमुना स्वाक्षरी वैयक्तिक होणार जन्म दिनांक वयाचा पुरावा इत्यादी माहिती या सोबतच्या नमुना तीन ब या विहित नमुन्यात पाठवावी.



वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.