कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची वेतन वाढ अनुज्ञेय करणे बाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र.

 कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची वेतन वाढ अनुज्ञेय करणे बाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 22 जुलै 2022 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना ३ जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी ची वेतन वाढ अनुज्ञेय करण्याबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक केले आहे.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एक जुलै ची वेतन वाढ अनुज्ञेय करण्याबाबत माननीय न्यायालयात विविध याचिका दाखल केले आहेत अशा अनेक याचिकांमध्ये 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलै ची वेतन वाढ अनुज्ञेय करण्याचे माननीय न्यायालयाचे आदेश आहेत.


याच विषयाबाबत एक अन्य प्रकरणात माननीय केंद्र प्रशासकीय न्यायाधिकरण बेंगलोर यांच्या १८ डिसेंबर 2019 व माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांच्या दिनांक 22 ऑक्टोबर 2020 च्या आदेशांच्या अंमलबजावणीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पाच एप्रिल 2021 च्या शासन आदेशान्वयी स्थगिती दिली आहे सदर वस्तुस्थिती केंद्र शासनाने संदर्भीय 24 जून 2021 च्या ज्ञापन्वये निदर्शनास आणून दिली आहे सदर विषयाबाबत केंद्र शासनाने अध्याप निर्णय घेतला नसल्याने राज्य शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील तरतुदीनुसार सुधारणा केलेली नाही.


सदर विषयाच्या अनुषंगाने माननीय न्यायालयात याचिका दाखल झाल्यास वरील वस्तुस्थिती मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणावी तसेच अशा एक जून रोजी झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजी वेतन वाढवणे करण्याबाबत याचिकांमध्ये माननीय न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावी व त्यात केंद्र शासनाचे संदर्भीय 24 जून 2021 चे विज्ञापनातील वस्तुस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावी अशी विनंती आहे.

सदरचे पत्र वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायनुसार निर्गमित करण्यात येत आहे.वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.