इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा आपण स्वतः आपल्या मोबाईल/पीसी/लॅपटॉप वरून.

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा आपण स्वतः आपल्या मोबाईल/पीसी/लॅपटॉप वरून.


इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे आपल्या कार्यालय प्रमुखांच्या नंबर वरून या अगोदर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेल्या माहितीचे विवरणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने इन्कम टॅक्स रिटर्न आपल्या स्वतःच्या मोबाईल लॅपटॉप अथवा पीसी वरून स्वतः भरू शकतात.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर जर आपण या अगोदर आपणास पडणाऱ्या टॅक्स पेक्षा जास्त रक्कम इन्कम टॅक्स म्हणून भरणा केलेली असेल तर लगेच आठ दिवसाच्या आत आपली जास्तीची रक्कम व्याजासकट आपल्या खात्यावर जमा होते.

आपल्या मोबाईल पीसी लॅपटॉप वरून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी गुगल सर्च करा Income Tax return filing व सर्च लिस्ट मध्ये आलेल्या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करा.

वेबसाईट लॉगिन वर क्लिक करून आपला युजर आयडी म्हणून पॅन क्रमांक टाका. त्यानंतर माहीत असल्यास पासवर्ड टाका अन्यथा फॉरगेट पासवर्ड करून ओटीपी घेऊन पासवर्ड सेट करून लॉगिन करा.
लॉग इन झाल्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईलवर आपला ईमेल आयडी मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर चेक करून घ्यावा व बाजूला असलेल्या File Now या निळ्या बटनवर क्लिक करा.ओपन झालेल्या नवीन विंडो मधील Individual च्या बाजूच्या गुगलवर टिक करा व निळ्या Continue बटन वर क्लिक करा.
त्यानंतर ओपन करा विंडोमध्ये सिलेक्ट असेसमेंट इयर मध्ये असेसमेंट इयर म्हणून 2022-23 निवडा त्या खालील मूड ऑफ फिलिंग मध्ये ऑनलाईन च्या बाजू ला असलेल्या गोल वर टिक करा खाली कंटिन्यू हे बटन निळे झालेले दिसेल त्यावर क्लिक करा.


समोरील विंडो ओपन होईल त्यामध्ये एक एक करून पर्सनल इन्फॉर्मेशन, ग्रॉस टोटल इन्कम, टोटल डिडक्शन, टॅक्स पेड़, टोटल टॅक्स लायबिलिटी यावर क्लिक करून आपल्या विवरण पत्रानुसार माहिती बरोबर असल्याची खात्री करा माहिती बरोबर नसल्यास त्यामध्ये दुरुस्ती करा. 

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोसीड या बटन वर क्लिक करून आयटीआर वन आपल्या डिवाइस मधूनच व्हेरिफाय करण्यासाठी लेट्स गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करा. 


त्या अगोदर खालील विंडो मधील सर्व पाचही क्षेत्र कन्फर्म केल्याची खात्री करा. 


जास्तीचा टॅक्स आपल्या पगारातून वजावट झालेला असेल व तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळालेला असेल तर तो पॅन अकाउंट वर दिसेल व तू रिफंड असलेली रक्कम देखील आपल्याला पुढील विंडोत दिसून पडेल. सर्वात शेवटी आपण भरलेल्या माहितीचा टीव्ही पाहिल्यानंतर आपल्याला रिटर्न सबमिट करावा लागेल त्यासाठी पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यावरील योग्य ते ऑप्शन वर क्लिक करून आपण प्रोसीड टू  प्रिव्ह्यू वर क्लिक करा. 

प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा अशा प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. 

हा इन्कम टॅक्स रिटर्न आपण आपल्या मोबाईल लॅपटॉप पीसी वरून व्हेरिफाय देखील करू शकता त्यासाठी आपले आधार कार्ड पॅन कार्ड व मोबाईल नंबर एकमेकांशी कनेक्ट असणे आवश्यक आहे. 

आधार ओटीपी वापरून आपण इन्कम टॅक्स कसा ती व्हेरिफाय करायचा यासाठी आमची पुढची पोस्ट आपल्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

3 Comments

  1. दादा तुम्ही देत असलेली माहिती खूप सुस्पष्ट आणि सामान्य व्यक्तीला समजेल एव्हड्या सोप्या भाषेत असते

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.