सरळ सेवा भरती आरक्षण अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणी बाबत आजचे परिपत्रक.

 सरळ सेवा भरती/आरक्षण/अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणी बाबत आजचे परिपत्रक.


सर्व नियुक्ती प्राधिकार्‍यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरती बाबतचे वार्षिक विरण पत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर वेळोवेळी लावण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने या अगोदर दिल्या आहेत तथा ती सदर विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येत नसल्याबाबतची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.


सर्व नियुक्ती प्राधिकारी आस्थापना अधिकारी यांना कळविण्यात येते की सरळ सेवा भरतीसाठी दिनांक सहा जुलै 2021 च्या शासन निर्णय विहित केलेल्या बिंदू नामावली नुसार प्रत्येक संवर्गातील सरळ सेवेची मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विरोणा पत्रानुसार वेळोवेळी सूचना फलकावर लावावी.


उपरोक्त सूचना सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय सेवा मंडळे महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महामंडळे शासकीय अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठे सहकारी संस्था अशासकीय उपक्रम शासनाच्या अधिपत्याखाली किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळ यांना लागू आहेत.


मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की याबाबत त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख आस्थापना अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात तसेच त्यांनी उपरोक्त माहिती सूचना फलकावर लावावी किंवा कसे याबाबतचा वेळोवेळी आढावा घेऊन अशी कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाही करावी.
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.