कर्मचाऱ्यांना थकित रक्कम व्याजासह अदा करण्यात यावी - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कर्मचाऱ्यांना थकित रक्कम व्याजासह अदा करण्यात यावी - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळतात सदर लाभ सेवानिवृत्तीनंतर तीन महिन्याचे हात शासनाला अदा करणे बंधनकारक आहे. परंतु सदर लाभ देण्यास तीन महिन्या पेक्षा जास्त कालावधी लागला तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सदर थकित रकमेवर शासनास व्याज द्यावे लागेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, तो पुढील प्रमाणे.वरील न्यायालयाचा निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर अनेक लाभ मिळतात. यापैकी सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ महत्वपूर्ण आहे. हा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती झाल्यानंतरच्या लगतच्या दिनांकापासून पुढील 3 महिन्यात कर्मचाऱ्यांना अदा करणे राज्य शासनास बंधनकारक असते.

परंतु जर सदर उपदानाची रक्कम अदा होण्यास विलंब झाल्यास ,सदर कर्मचाऱ्यास व्याजासह उपदानाची रक्कम अदा करण्यात येते. कर्मचाऱ्यांवर न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्यास, अशा कर्मचाऱ्यांस सदर रक्कम दोषमुक्त झाल्यास मिळते. सदर रक्कम कर्मचाऱ्यांवरील न्यायिक प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच्या दिनांकापासून उपदानाच्या रक्कमेवर व्याज अनुज्ञेय राहील. परंतु विनोदकुमार दीक्षित यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असेल व सदर प्रकरण सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतरही, प्रलंबित आहे. परंतु सदर कर्मचारी दोषमुक्त झाल्यास त्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या लगतच्या दिनांकापासून व्याज अनुज्ञेय राहील असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.