दिनांक 9 जून 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल चे अनावरण ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते होणार

दिनांक 9 जून 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल चे अनावरण होणार ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते.

उद्या बदली प्रक्रियेला होणार सुरुवात.

ग्रामविकास विभागाची दिनांक 8 जून 2022 रोजीच पत्र.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 8 जून 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय सात एप्रिल 2019 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जसे की बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निवड रिक्त पदांची यादी संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी साठी वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहे.

सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन 2022 मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे सदर प्रणाली चे अनावरण गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी दुपारी चार वाजता माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य महोदयांच्या हस्ते कक्ष क्रमांक 702 सातवा मजला मंत्रालय मुंबई येथे करण्यात येणार आहे तरी सदर ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीच्या अनावरण कार्यक्रमास भिशी द्वारे उपस्थित राहण्याची विनंती  सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना करण्यात आली आहे.

संपूर्ण शासनादेश पुढील प्रमाणे.


 संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.