यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार कोरी करकरीत नवी पाठ्यपुस्तके मा. वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री.

यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना 

मिळणार कोरी करकरीत नवी पाठ्यपुस्तके 

 मा. वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री. 


गेल्या दोन वर्षात covid-19 परिस्थितीमुळे पुस्तक छपाई मध्ये व्यत्यय आला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळू शकली नाही काही विद्यार्थ्यांना जुनीच पुस्तके वापरावी लागली. 

परंतु सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी करकरीत पुस्तके हातात मिळणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. 

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात कोरी करकरीत नवीन पुस्तके मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. याच विचाराने यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे दि. १३  जून रोजी, व विदर्भात 27 जून रोजी आपल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके असतील, याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.


 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी रवाना झाली. लवकरच उर्वरित पुरवठा पूर्ण करण्यात येईल. 

माननीय शिक्षण मंत्र्यांनी पहिल्या पुस्तकांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना केली तर पुणे येथून माननीय शिक्षण आयुक्त यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पहिली गाडी रवाना झाली. 

समग्र शिक्षा अभियानांतर्गत इ.१ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ५ कोटी ४० लाख ९० हजार ७०६ मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत.या शिवाय खुल्या बाजारातील विक्री अंतर्गत इ.१ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी २९ लाख ३८ हजार ७०० पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. माननीय शिक्षण मंत्र्यांचे वरील ट्विट ट्विटरवर पाहण्यासाठी.. 

येथे क्लिक करादररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.