केंद्र प्रमुखाची पदे सरळ सेवेने व मर्यादित विभागीय परीक्षा द्वारे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करणे बाबत शासन निर्णय

केंद्र प्रमुखाची पदे सरळ सेवेने व मर्यादित विभागीय परीक्षा द्वारे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करणे बाबत. शासन निर्णय. 


नुकतेच शिक्षण मंत्री यांनी ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहा विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख यांचे पद भरती संदर्भात विनंती केली आहे व त्यानुसार ग्राम विकास विभागाने पत्र निर्गमित करून विभागीय आयुक्तांना त्यांच्या विभागातील रिक्त पदांचा अहवाल देखील मागितला आहे व तातडीने शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे पदे भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू झाली आहे. 

केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या भरती संदर्भात शिक्षण मंत्री व ग्रामविकास विभागाचे पत्र

विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख या पदासाठी दिनांक 19 सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी ही पदे सरळ सेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आला आहे तो शासन निर्णय आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

10 जून 2014 अधिसूचना नुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पात्रता

1.शिक्षण विस्तार अधिकारी

पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.

            2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव 

            3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल ) 

निवड : 1) सरळसेवेद्वारे 50%

           2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 25%

          3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 25%

2.केंद्रप्रमुख पदासाठी

पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.

            2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव 

            3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल ) 


निवड : 1) सरळसेवेद्वारे 40%

           2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 30% 

          3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 30%

          4) भाषा , गणित विज्ञान , समाजिक शास्त्र नुसार पदे भरली जातात. 

केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे. थोडक्यात पेपर दोनचा अभ्यासक्रम व त्यास घटकनिहाय गुण पुढीलप्रमाणे आहेत.


▪️ पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह. 


1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण


•  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण


•  माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण


• अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण


•  माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण


• वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण


• संप्रेषण कौशल्य  - 5 गुण


    एकूण - 100 गुण
 वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.