समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022-23 करिता मोफत पाठ्यपुस्तके वितरणाबाबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र

 समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022-23 करिता मोफत पाठ्यपुस्तके वितरणाबाबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र.

महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयाच्या दिनांक 27 मे 2022 रोजी च्या पत्रानुसार समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022-23 करता मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिका यांची बालभारतीचे भंडारी तालुका किंवा मनपा स्तरापर्यंत ची वाहतूक सुट्टीच्या कालावधीमध्ये सुरू ठेवण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना काही सूचना देण्यात आल्या आहे. 

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस करिता बालभारती भंडारा तालुका मनपा स्तरापर्यंत पाठ्यपुस्तक वाहतुकीचे 82 टक्के काम पूर्ण झालेले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे बालभारतीच्या सर्व भंडारा तील अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक 28 व 29 मे 2022 या शासकीय सुटीच्या या कालावधीमध्ये सुद्धा पाठ्य पुस्तके वितरणाची समर्थता दर्शविली आहे मुक्त बाब विचारात घेता दिनांक 28 मे 2022 ते 29 मे 2022 या शासकीय सुटीच्या कालावधीमध्ये बालभारतीचे गोदाम ते तालुकास्तरावरील पाठ्यपुस्तक वाहतूक सुरू ठेवण्याबाबत आपणास निर्देश देण्यात येत आहे.

फक्त शासकीय सुट्टी च्या कालावधीमध्ये बालभारतीच्या भंडारा मध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आपला प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी.

फक्त कालावधीमध्ये जा तालुका मनपा स्तरावरील पाठ्यपुस्तकांची वाहतूक होणार आहे अशा ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी पाठ्यपुस्तके स्वीकृती करता उपस्थित राहून पाठ्यपुस्तके स्वीकारल्यानंतर पुरवठादारास पोहोच देण्याची दक्षता घ्यावी तसेच पाठ्यपुस्तकांची वाहन तालुका व मनपा स्तरावर अधिक वेळ खोळंबून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

शिक्षणाधिकारी बालभारतीचे भांडार प्रमुख आणि बालभारती भंडारा करता नियुक्त शिक्षण अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांनी समन्वय ठेवून सुट्टीच्या कालावधीमध्ये पाठ्यपुस्तके वितरण सुलभरीत्या सुरू राहील याची दक्षता घ्यावी तसेच चुकीच्या कालावधीमध्ये पाठ्यपुस्तक वाहतूक करता आवश्यक वाहनांची संख्या भंडार प्रमुखांनी वाहतूकदारास कळवावी.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वरील शासकीय सुट्टी नंतरच्या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास सदर सुट्ट्यांच्या दिवशी वरील सूचनांनुसार पाठ्यपुस्तकांची वाहतूक परस्पर सहमतीने करण्यात यावी अशा सूचना माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


वरील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.