सुरु होणारे शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये भारत सरकारच्या निपून भारत (NIPUN BHARAT) "मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची" अंमलबजावणी करणे बाबत - शासन निर्णय

 सुरु होणारे शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये भारत सरकारच्या निपून भारत (NIPUN BHARAT) "मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची" अंमलबजावणी करणे बाबत - शासन निर्णय


 युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा 65% ते 74% वेळ वाया गेला आहे.

अझिम प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 42 टक्के मुले ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहू शकली ज्या मुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहणे शक्य झाले त्यांच्या बाबतीत सदर संधी अपेक्षित परिणाम कारक ठरली नाही बहुसंख्य शिक्षक इन वर्गामध्ये दररोज प्रत्येक व्यक्तीला एकच तास शिकू शकले 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अधिक शिक्षकांना ऑनलाइन विद्यार्थ्यांबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले व 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरीत्या करणे अशक्य झाले. 

एशियन विकास बँक 2021 नुसार शाळा बंद राहील यामुळे पाच एशियन देशांमधील भारतासह मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या 3.5% ते 4.7 टक्के नुकसान झाले तसेच दक्षिण आशियाच्या सण 2020 सालच्या एकूण ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच ते सात टक्के नुकसान झाले. 

एका सर्वेक्षणानुसार शाळा आधीच सोडलेल्या तीन टक्के मुलांबरोबरच सहा टक्के मुले शाळेत परतण्याची शक्यता नाही महामारी नंतर शिक्षणव्यवस्थेत मधून आणखी 24 दशलक्ष मुलांची गर्दी होईल म्हणून सध्याची स्थिती व केलेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहील यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पाया पायाभूत शिक्षण असणे आवश्यक आहे. 

त्यासाठी राज्यात सन दोन हजार 26 27 पर्यंत इयत्ता तिसरी पर्यंतच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता तिसरी पुढे गेलेल्या तथापि अपेक्षित क्षमता प्राप्त करून न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निघून भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानाची सुरुवात महाराष्ट्र शासन या शासन आदेशानुसार करत आहे. 

यानुसार भाषिक कौशल्य अंतर्गत मौखिक भाषा विकास उच्चारशास्त्र याची जाणीव सांकेतिक भाषा लिपी समजून घेणे शब्दसंग्रह वाचन व आकलन वाचनातील ओघवतेपणा लेखन आकलन व वाचन संस्कृती क्यू वाचनाकडे कल ह्या गोष्टी अंतर्भूत असतील. 

पायाभूत संख्या साक्षरता संख्याज्ञान व गणितीय कौशल्य यामध्ये संख्या पूर्वक गणन व संख्या ज्ञान संख्या वरील प्रिया गन्ना करणे आकार व अवकाश याबाबत समजून घेणे व नमुना संरचना यांचा समावेश असेल. 

या अभियानांतर्गत राज्यातील तीन ते नऊ वर्षे वयोगटातील सर्व  सर्व विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार 26 27 पर्यंत पुढील किमान कौशल्य लक्ष निर्धारण करण्यात येत आहे. 

यामध्ये भाषा साक्षरता, संख्या साक्षरता, व आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासणे यांचा समावेश असेल. 


मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचे प्रमुख सहा आधारस्तंभ असतील. 
ज्यामध्ये संबंधित घटकांचे निदान. 
सर्व स्तरावरील उद्दिष्टे व लक्षणे यांचे निर्धारण. 
उच्च दर्जाचे अध्ययन व अध्यापन साहित्य. 
शिक्षकांचा व्यावसायिक विकास. 
शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा. 
 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. 

 अभियानात गृह अध्यापन आणि स्वयंशिक्षण याची मदत घेतली जाईल. 
Covid-19 महामारी च्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांची महत्त्व लक्षात आले आहे यामुळे पालकांना शिक्षण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागत आहे केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. 
यासाठी पालकांच्या मदतीसाठी घरी भरपूर छापील साहित्य उपलब्ध करून देणे जलद वाचन संख्या साक्षरता पाढे यासाठी वाचन साहित्य कार्य पुस्तका इत्यादी सामग्री घरी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 
यासाठी शाळेच्या ग्रंथालयातून छोटी गोष्टींची पुस्तके अध्ययन अध्यापन साहित्य आधारी पालक मुलांबरोबर घरी नियमितपणे कृती करू शकतील अशी कार्यपुस्तिका व कृतींची यादी आपण पालकांपर्यंत पोहोचू शकतो. 
व इतर बरेचशे घरचे साहित्य जसे की कॅलेंडर वर्तमान पत्रे तक्ते चित्र ह्या इतर छोट्या-मोठ्या वस्तू यांचा अध्ययन अध्यापनात कसा उपयोग होतो हे पालकांच्या लक्षात आणून देणे. 
अध्ययन अध्यापनात इंटरनेट मोबाईल फोन संगणक व इतर साधने कसे उपयोगी ठरू शकतात हे देखिल आपण पालकांना सांगू शकतो. 
किंवा गाव मोहल्ला स्तरावर शिकलेले स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे वाचन आकलन लेखन व संख्या ज्ञान सुधारण्यासाठी कसे उपयोगी ठरते त्यांना विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तरी आपण करू शकतो व त्यांची मदत देखील आपण या कामी घेऊ शकतो. 
सहाध्यायी घरातील मोठे भाऊ बहीण यांचेदेखील विद्यार्थ्यांचे वाचन आकलन लेखन संख्याज्ञान व संख्या ज्ञान वरील क्रिया यासाठी कसा उपयोग होईल यांचे नियोजन करता येईल.
रीड टू मी, रीड अलोंग अशा वेगवेगळ्या मोबाईल ॲप्लिकेशन वापरून वाचन आकलन कसे सुधारेल यासाठी वेगवेगळे मोबाईलचे एप्लीकेशन यांची माहिती आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे वाचन लेखन व संख्याज्ञान सुधारण्यास मदत घेऊ शकतो. 
वरील सर्व गोष्टींचे संनियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सुकाणू समितीची ची स्थापना करण्यात आली आहे. 

राज्यस्तरीय सुकाणू समिती, जिल्हास्तरीय सुकानु समिती
राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्ष, 
जिल्हा प्रकल्प संनियंत्रण कक्ष. 
 यांच्या रचना भूमिका व जबाबदाऱ्या सदर शासन निर्णय निश्चित करण्यात आल्या आहेत. 

सोनी यंत्रणांमध्ये राज्यस्तरावर समग्र शिक्षा मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे काम पाहतील तर. . . 
जिल्हा स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था काम पाहतील. 
तालुकास्तरावर गट व केंद्र साधन केंद्र अंमलबजावणी साठी मदत करतील. 
गावस्तरावर ग्रामपंचायत व महिला बाल विकास एकात्मिक योजनेअंतर्गत अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस हे देखील या अभियानात मदत करतील. उत्तर शाळा व्यवस्थापन समितीवर यात महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.