भविष्य निर्वाह निधीच्या व्याजा वरील आयकर कपातीबाबत महत्वाचे परिपत्रक

 भविष्य निर्वाह निधीच्या व्याजा वरील आयकर कपातीबाबत महत्वाचे परिपत्रक. 

भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याजावर ही द्यावा लागेल आयकर! 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पारित केलेल्या अध्यादेशानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2021 पासून भविष्य निर्वाह निधीच्या व्याजा वरील आयकर कपाती बाबत खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आले आहे. 

१) सदर अध्यादेशानुसार दिनांक 1 एप्रिल 2021 पासून भविष्य निर्वाह निधी खाते हे करपात्र व  अकरपात्र असे विभागले जाईल तसेच वैयक्तिक भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप मध्येही दर्शवले जाईल. 

२) दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा असलेल्या भविष्य निर्वाह निधी रकमेवर कमावलेले कोणतेही व्याज हे आयकरात पात्र राहणार नाही. 

३) दिनांक 1 एप्रिल 2021 पासून 2 लक्ष 50 हजार वरील मूळ पगार व महागाई भत्ता वरील 12% भविष्य निर्वाह निधीचा कपात झालेल्या कर्मचारी वाटा कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कपात केलेला भविष्य निर्वाह निधीचा वाटा परतावा व भविष्यनिर्वाह निधीची उचल परतफेड यावर कमावलेली व्याज हे आयकर कपातीस पात्र असेल. 

४)कंपनी अथवा शासनाच्या वाटयावरील भविष्यनिर्वाह निधीवर आयकर लागू असणार नाही. 

(याचा संबंध NPS शी जोडल्यास शासन हिस्सा कर पात्र असणार नाही) 

५) आयकर कपात ही ज्यावेळी व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल किंवा अंतिम प्रदान वेळेला कर्मचारी अंतिम प्रधानाची याची प्रत्यक्ष रक्कम घेतील त्या वेळी केली जाईल. 

६) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधून घेतलेला परतावा व नापरतावा उचल सर्वप्रथम करपात्र योगदानातून वजा केली जाईल व उर्वरित रक्कम ही अकरपात्र योगदानातून वजा केली जाईल. 

७) परतावा उचल ची पगारातून केलेली वसुली ही आयकर कपातीसाठी ग्राह्य धरली जाईल. 

८) ज्या कर्मचाऱ्याची पॅन कार्ड पगार पत्रकास लिंक असतील त्याचे दहा टक्के प्रमाणे आयकर कपात करण्यात येईल तसेच ज्यांची पॅन कार्ड लिंक नसेल त्यांचे 20 टक्के प्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. 

९) जे कर्मचारी वीस किंवा 30% च्या स्लॅब मध्ये असतील तर त्यांनी भविष्य निर्वाह निधी विभागाने कपात केलेला दहा टक्के वरील आयकर स्वयम् मूल्यांकन कराद्वारे भरावा. 

१०) दोन लक्ष 50 हजार वरील कपात झालेल्या भविष्यनिर्वाह निधीच्या वाट्यावर कमावलेले व्याज पाच हजार पेक्षा कमी असेल तर भविष्य निर्वाह निधी विभागाकडून कपात केली जाणार नाही परंतु जर कर्मचाऱ्यांनी इतर करपात्र उत्पन्न पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांनी पाच हजार रुपये पर्यंत कमावलेल्या भविष्य निर्वाह निधी च्या व्याजावर आयकर स्वयम् मुल्यांकन कराद्वारे भरावा लागणार. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.