भ्रष्टाचारी अनुदानित संस्थाचालकांवरही होणार कार्यवाही? - आजचा शासन निर्णय

भ्रष्टाचारी अनुदानित संस्थाचालकांवरही होणार कार्यवाही? -

आजचा शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आज दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. 
 या शासन निर्णयानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत शासकीय अनुदानित महाविद्यालय यातील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष संचालक सभासद यांचे विरुद्ध अभियोग दाखल करण्यास मंजुरी देण्यासाठी प्राधिकारी घोषित करणेबाबत चा हा शासन निर्णय आहे. 

सदर शासन निर्णयानुसार जर अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हा अपचारी असेल तर त्याची विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष/संचालक सक्षम प्राधिकारी असतील. 

परंतु संस्थेचे अध्यक्ष संचालक किंवा सभासद यांच्यासह प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अपचारी असल्यास मात्र संबंधित धर्मदाय आयुक्त किंवा सह आयुक्त हे सक्षम प्राधिकारी असतील असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील शासन निर्णय बाबत सविस्तर असे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 खाली अभियोग दाखल करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व मंजुरीकरिता प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर करावयाच्या कार्यवाही बाबत सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार राज्याच्या व्यवहाराशी संबंधित सेवेमध्ये असलेल्या राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय सेवेतून काढून टाकता न येणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत शासनाची व इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत त्याला त्याच्या पदावरून काढून टाकण्याबाबत सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी असल्याशिवाय न्यायालय अपराधाची दखल घेणार नाही अशी तरतूद असल्यामुळे ज्यांना शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते अशा अन्य संस्थांमधील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध अभियोग दाखल करण्यास पूर्व मंजुरी देण्यासाठी वरील प्रमाणे सक्षम प्राधिकारी नेमण्यात आलेले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 खाली अभियोग दाखल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12 2 2013 च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेली कार्यपद्धती जशी लागू आहे कशी लागू राहील. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.