पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्यात येतील राज्यपालांचे आदेश- शासन निर्णय

 पदोन्नतीच्या प्रस्तावांचा होणार जलदगतीने निपटारा.

शासन आदेशानुसार कार्यपद्धती निश्चित.


प्रशासनातील जास्त जागा रिकाम्या असल्यामुळे कामाची गती कमी होऊन प्रशासन चालवण्यास अडचणी निर्माण होतात. हे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र देऊन पदोन्नतीच्या प्रस्तावाचा जलद गतीने निपटारा करून त्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात असे निर्देश दिले आणि या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक 9 मार्च 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला पुढील प्रमाणे.

या शासन निर्णयानुसार पदोन्नती चे प्रस्ताव जलदगतीने निकाली काढावे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 पदोन्नतीसाठी विहीत वेळापत्रकाचे पालन करणे.

विभागीय पदोन्नती समितीची बैठक प्रतीवर्षी सप्टेंबर मध्ये आयोजित करणे.

गोपनीय अहवाल यांची पूर्तता करणे. 

प्रतिवर्षी अद्ययावत सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे.

पदोन्नती च्या अनुषंगाने सेवाविषयक बाबी चे अध्यक्ष त्याच्या वेणीची निर्गमित करण्याची दक्षता घेणे.

आरक्षणानुसार प्रस्तावाची तपासणी करणे

पदोन्नतीसाठी च्या सर्व निकषांची पूर्तता करणे.
सामान्य प्रशासन विभागात संप परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे.
पदोन्नतीचे आदेश विनाविलंब निर्गमित करणे. 
याविषयी स्पष्ट सूचना सदर शासन निर्णय नुसार देण्यात आले आहे.
वरील आदेशाचे पालन केल्यास प्रशासकीय कामातील दिरंगाई दूर होऊन जलद गतीने प्रशासन चालवण्यास सोपे जाईल.

आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम दहा मध्ये विहित केलेल्या मुदतीत पदोन्नती प्रस्ताव देखील निकाली काढण्यात येतील.


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Downloadअधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoधन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.