पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर एक उत्तुंग व्यक्तिमत्व - प्रेरणादायी व्यक्ति परिचय

 पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर एक उत्तुंग व्यक्तिमत्व - प्रेरणादायी व्यक्ति परिचय.. 


बुलढाणा जिल्ह्यातील एक व्यक्ती भारतचा उच्च अशा सन्मानाने सन्मानित होतो अशा व्यक्तीचे त्याच्या जिल्ह्यात देखील जाहीर नागरी सत्कार करण्याची मातृभूमि परिवार बुलढाणेकर यांनी ठरविले. खाली त्यांचा सत्कार दिनांक 9 मार्च 2020 रोजी गर्दे वाचनालय बुलढाणा येथे करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी हे होते तर

सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर व डॉक्टर सौ प्रमोदिनी बावस्कर या दाम्पत्याचा सत्कार पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांचे शुभ हस्ते करण्यात आला यावेळी विशेष उपस्थिती माननीय श्री एस रमामुर्ती जिल्हाधिकारी बुलढाणा यांची होती.

सुप्रसिद्ध पद्मश्री डॉक्टर कोल्हे दांपत्य यांच्या हस्ते सत्कार कारण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. त्या वरून त्यांचे विषयी जाणून घेऊ.

डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचे बालपण.

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे बालपण शेतकरी कुटुंबात गेले शेवटचे आपत्य म्हणून त्यांचे कडे कुटुंबात जास्त लक्ष दिले जात नव्हते. अत्यंत गरिबी आणि हलाखीची होती. अश्या परिस्थितीत सर्व कुटुंबाच्या सर्व मुलभूत गरजा पूर्ण करणे देखिल शक्य नव्हते. त्यांच्या वडिलांचे नाव सलुबा तर नाव रखमाबाई होते. त्यांचा जन्म भोकरदन तालुक्यातील देहेद (Dehed) गावात ३ मार्च १९५१ रोजी झाला.

डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचे शिक्षण.

प्राथमिक शिक्षण दूधा तालुका जिल्हा बुलढाणा या त्यांच्या मूळ गावी झाले तर पुढील शिक्षणासाठी त्यांना बुलढाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागले त्यांची मोठी भावंडे देखील बुलढाणा येथे शिकत असल्यामुळे भाड्याची खोली घेऊन त्यांचे कुटुंब 10 बाय 10 च्या रूम मध्ये राहत असे आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवत असे. त्यांच्या मोठ्या भावाचं बुलढाणा तील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांचं कुटुंब मूळ गावी गेलं आणि डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना शिक्षण थांबविण्याचा सल्ला मिळाला परंतु डॉक्टर बावस्कर यांनी आपल्या आईकडे आपण आपल्याला पुढील शिक्षण पूर्ण करायचे तसा आग्रह धरला आई नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी राहिली आणि आणि त्यांच्या हायस्कूल प्रवेशासाठी त्यांचे वडील आणि छोटे हिम्मतराव बुलढाण्याच्या नगरपरिषदेच्या दुमजली इमारतीत पोहोचले. 

बॅरिस्टर च्या पोराला शाळेत प्रवेश.

शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर त्यांची शेतकरी वडील आणि त्यांचं त्यांच्या राहणीमानामुळे त्यांना बाहेरच वाट पाहण्याचे सांगण्यात आले. तब्बल दोन तास वाट पाहिल्यानंतर जेव्हा शाळेतील मुख्याध्यापक त्यांच्या कक्षातून बाहेर आले आणि यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता मुलाचे मुलाचा शाळेत प्रवेश घ्यायचा आहे असे त्यांच्या वडिलांनी सांगितले त्यांच्याकडे तिरसट नजरेने पाहून मुख्याध्यापकांनी त्यांच्यात सहाय्यकाला या बॅरिस्टर च्या कारट्याचा प्रवेश करून घे रे असा आदेश दिला. आणि त्यांचा हायस्कूल प्रवेश झाला तेथील मुख्याध्यापकाने त्यांच्या वडिलांना दिलेली वागणूक मात्र त्यांच्या वडिलांना पोचली आणि ती सल जेव्हा डॉक्टर बावस्कर पुण्यामधील नामांकित मेडिकल कॉलेजमधून एम डी उत्तीर्ण झाले त्यावेळी डॉक्टर बावस्कर यांना बोलून दाखविली. म्हणून जेव्हा डबल बावस्कर यांनी आपले स्वतःचे आत्मचरित्र लिहिले त्या आत्मचरित्राला 'बॅरिस्टरचं कार्ट' असं नाव दिलं. 

त्यानंतर डॉक्टर बावस्कर हे करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी गेले तेथे देखील त्यांनी वेगवेगळी कामे करून आपली बीएससी ही पदवी पूर्ण केली आणि त्यावेळी ते बी एस सी मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आले आणि त्यानंतर कळाले की आपण एमबीबीएसला प्रवेश घेऊ शकतो याची जाणीव त्यांना त्यांच्या प्राध्यापकांनी करून दिली. त्यानंतर डॉक्टर बावसकर यांची एमबीबीएसला नागपूर येथील गव्हर्मेंट कॉलेजला प्रवेश झाला आणि तेथे देखील त्यांनी कमालीचे कष्ट घेऊन आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. 


डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचे डॉक्टर म्हणून नोकरी ची सुरुवात.

नागपूर येथून एमबीबीएस पूर्ण करून नागपूर जवळ आजुबाजूला नोकरी मिळत असताना दखीलमुंबई मुंबई विषय असलेल्या त्यांच्या आकर्षणामुळे आपण मुंबई जवळ कुठेतरी नोकरी पक पत्करावी म्हणून त्यांनी महाड तालुक्यात एका पी एच सी वर वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी पत्करली आणि तेव्हापासून त्यांची शासकीय सेवा सुरू झाली. शासकीय सेवेत गोड गरिबांची निशुल्क सेवा करण्याचे व्रत त्यांनी तेव्हापासून अंगिकारले. 

विंचू दंशामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी संशोधन.

नियमित तपासणी करताना त्यांच्या असे लक्षात आले की, कोकणातील काही लोकांना जेव्हा विंचू चावतो तेव्हा इतर ठिकाणी आढळणाऱ्या विधानसभ प्रमाणे खूप जास्त वेदना न होता कमी वेदना होतात परंतु त्यानंतर त्या व्यक्तीला घाम येऊन विंचू दंश यामुळे त्यांना मृत्यू येतो हे त्यांच्या लक्षात आले आणि असे काही मृत्यू त्यांच्या डोळ्यादेखत झाल्यामुळे त्यांनी त्या वरील औषध शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणतेही औषध परिणाम कारक ठरत नव्हते कोकणात विंचूदंशावर ची दहशत अशी होती की जर एखाद्या व्यक्तीला विंचू दंश झाला तर ते लोक त्याच्या अंत्यविधीच्या तयारीला लागत. मग जर रुग्ण दगावत अच आहे तर त्याला वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो याविषयी त्यांनी संशोधनास सुरुवात केली आणि रुग्णावर त्याचा प्रयोग करण्यास त्यांच्या या नातेवाइकाकडून परवानगी मिळवली. एकदा अशाच एका श्रीमंत व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलाला विंचू दंश झाला आणि त्याला दवाखान्यात दाखल केल्या गेले त्यांनी त्या मुलाच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन त्यावर उपाय करण्यास सुरुवात केली आणि तो यशस्वी झाला आणि तो मुलगा वाचला यापुढे त्यांनी संशोधन सुरू ठेवून विंचू दंश झालेला रुग्ण लवकरात लवकर कसा बरा होईल याचे देखील संशोधन करून त्यावर उपाय शोधला त्यांनी केलेले हे संशोधन इंग्लंड अमेरिकेसारख्या देशातील वैद्यकीय क्षेत्रात नामांकित मासिक आणि पाक्षिक यामध्ये प्रसिद्ध झाला. आणि डॉक्टर बावसकर यांची मेहनत सफल झाली. 

बॅरिस्टर च कार्ट M. D. 

एमबीबीएस झाल्यानंतर तब्बल सात वर्ष शासकीय नोकरी केल्यानंतर संशोधनासाठी एमडी करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 

संशोधनाचे महत्त्व पटले.

विंचूदंशावरिल औषध उपचारावर केलेले संशोधन आणि त्यापासून लोकांचे वाचणारी प्राण पाहून डॉक्टर बावस्कर यांना संशोधनाचे महत्त्व पटले आणि संशोधन अधिक परिणामकारक होण्यासाठी त्यांनी पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि वेगवेगळ्या वैद्यकीय उपचार पद्धती आणि औषध यांचे संशोधन त्यांनी सुरूच ठेवले डॉक्टर बावस्कर यांचे शंभराहून अधिक शोध प्रबंध नामांकित वैद्यकीय मासिक आणि पाक्षिक या मधून प्रकाशित झालेले आहेत. 

संशोधनाची आवड. 

संघर्षमय जीवनात देखील वेगवेगळे प्रयोग करून शिक्षण घेणारे डॉक्टर बावस्कर यांना मुळातच संशोधनाची आवड होती त्यामुळे समोर समस्या दिसली की त्यावर उपाय शोधण्यासाठी ते अनेक प्रयत्न करू लागले आणि ते प्रयत्न यशस्वी देखील होऊ लागले. 

सुप्रसिद्ध जर्नल्समध्ये संशोधन प्रसिद्ध.

डॉक्टर बावसकर यांची अनेक संशोधने सुप्रसिद्ध जर्नल्समध्ये देखील प्रसिद्ध झालेली आहेत. ज्या जगातील सुप्रसिद्ध जनरल चे वाचन संशोधनासाठी डॉक्टर बावस्कर हे संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करायचे अशा जर्नल्स मध्ये देखील खेड्यापाड्यात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची म्हणजे डॉक्टर बावस्कर यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. 


डॉक्टर बावसकर यांची वेगवेगळी संशोधने.

डॉक्टर बावस्कर यांनी फक्त विंचू दंश किंवा इंगळी चावल्यानंतर चार रुग्णांना वाचवण्यासाठी औषधच शोधुन काढली नाही तर अशा प्रकारची अनेक संशोधने डॉक्टर पावसकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेली आहे. 

डॉक्टर बावस्कर हे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन होणार पुढे आल्यानंतर त्यांच्या मूळच्या जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद या लगतच्या पट्ट्यातील अनेक रुग्ण किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू पावत होते ही गोष्ट त्यांच्या पर्यंत पोहोचली आणि आपला चमू घेऊन ते त्या भागात पोहोचले तेथील नमुने गोळा केली केस स्टडी केल्या आणि त्यावर संशोधन करून असा निष्कर्ष काढला की सदर जमीन ही खार पट्टा असल्यामुळे जमिनीखालून काढलेल्या पाण्यात कॅडमियम नावाचा पदार्थ सापडतो आणि हा कॅडमियम नावाचा पदार्थ मनुष्याच्या किडनीमध्ये अनेक वर्ष राहिल्यामुळे किडनीवर परिणाम करून किडनी निकामी करतो आणि त्यामुळे लोकांचा मृत्यू होतो हे त्यांच्या लक्षात आले त्यांचे हे संशोधन त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर महाराष्ट्र शासन यांनी कोणत्या उपाययोजना कराव्या हेदेखील सुचवले व त्यानंतर त्या उपाययोजना झाल्यामुळे आजच्या स्थितीला अशी रुग्ण दगावण्याची संख्या शून्यावर आली आहे. 

डॉक्टर बावसकर यांची कर्तव्यपरायणता.

वेगवेगळी संशोधन केल्यानंतर डॉक्टर बावस्कर ज्या रुग्णालयात कार्यरत होते त्या रुग्णालयात त्यांच्या संशोधनात शी संबंधित रुग्ण मुंबईसारख्या ठिकाणावरून आणि इतर ठिकाणावरून यायला लागले त्यांच्या रुग्णालयात गर्दी वाढू लागली मर्यादित कर्मचारी आणि साधन सामग्री मुळे त्यांच्यावर ताण यायला लागला अशावेळी त्यांच्या रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या शिपायाने बाहेरच्या बाहेर काही रुग्ण परत पाठवले हे जेव्हा डॉक्टर बावस्कर यांच्या लक्षात आले तेव्हापासून डॉक्टर बावस्कर यांनी रूग्णालयाच्या गेटच्या बाजूला थांबून रुग्ण परत जाणार नाही याची दक्षता घेतली आणि त्यांच्याकडून शक्य असेल तेवढ्या रुग्णांना निशुल्क सेवा देण्याचे काम केले. 

महाड या पी एच सी मध्ये कार्यरत असताना डॉक्टर बावस्कर दाम्पत्यांनी रात्र रात्रभर गरीब रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले तेही अतिशय नाममात्र शुल्क घेऊन. 

 बावस्कर यांच्या आईचे संस्कार.

डॉक्टर बावसकर यांच्या आयुष्यात आई वडिलांचे खूप मोठे योगदान आहे त्यांची आई वेळोवेळी त्यांच्या शिक्षणासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहिल्यामुळे ते त्या काळात गरीब परिस्थिती असताना देखील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकले हे करण्यासाठी वेळोवेळी त्यांना त्यांच्या आई वडिलांचे संस्कार उपयोगी पडले. 

मुले व पत्नी यांचा सहयोग.

विवाह नंतर डॉक्टर बावसकर यांच्या पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवेत समर्पित झाल्या म्हणूनच सत्काराला उत्तर देताना डॉक्टर बाविस्कर म्हणतात की मला मिळालेली पद्मश्री हे अर्धे माझ्या अर्धांगिनी चे आहे जर तिने मला साथ दिली नसती तर मी एवढे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधने पूर्ण करू शकलो नसतो. 

डॉक्टर बावस्कर हे आजही विविध वैद्यकीय संशोधनामध्ये गर्क असतात रुग्ण सेवेमध्ये गर्क असतात अशावेळी त्यांची मुले देखील त्यांना समजून घेऊन त्यांना त्यांचे काम करण्यासाठी शक्य तेवढी मदत करतात याचा उल्लेख करताना देखील डॉक्टर बावस्कर सत्काराला उत्तर देताना च्या भाषणात विसरले नाही. 

डॉक्टर बावस्कर यांचे नोकरी विषयी विचार.

फक्त कामाच्या तसा पुरते हजर राहणे साठी जर कुणाला सरकारी नोकरी करायची असेल तर त्यांनी सरकारी नोकरी करू नये आणि नोकरी करायचीच असेल तर पूर्णपणे झोकून देऊन समर्पण वृत्तीने गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी साठी त्यांना शासकीय सेवा पुरवण्यासाठी सरकारी नोकरी स्वीकारावी असे आवाहन देखील डॉक्टर 22 तर यांनी सदर भाषणात रकारी नोकरी करू इच्छिणार्‍या तरुणांना केले. 

निरंतर कार्यरत राहणे हेच खरे जीवन.

डॉक्टर बावसकर सध्या सत्तर वर्षाचा आहे तरी देखील त्यांचा उत्साह एका नवतरुण सारखा असल्याचा आपल्याला प्रत्यय येतो अतिशय स्पष्ट आणि परखड विचार डॉक्टर बावस्कर यांचे आहे त्यांच्या विचारानुसार जीवनात ही निरंतर कार्यरत राहणे हेच खरे जीवन आहे मानवी जीवन हे मर्यादित आहे आणि मर्यादित वेळेचा आपले ध्येय गाठण्यासाठी पुरेपूर उपयोग आपण करून घ्यावा आणि देशाची आणि गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी ते नेहमी निरंतर कार्यरत असतात. ती स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर बावस्कर म्हणतात की बरे झाले की या अगोदर तरुणपणात मला पद्मश्री मिळाले नाही नाहीतर रोजचे हारतुरे आणि सत्कार या मध्येच माझा वेळ निघून गेला असता आणि माझ्या हातून घडणारे संशोधन आणि रुग्णसेवा जी आतापर्यंत घडत आली तशी घडली नसती. 

त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली मदत. 

प्राथमिक शिक्षण घेत असताना, माध्यमिक शिक्षण घेत, असताना उच्च शिक्षण घेत, असतांना वैद्यकीय शिक्षण घेत असताना.. या आठवणी डॉक्टर बावस्कर सांगतांना त्यांना मदत केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव सांगतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पद्मश्री मिळाल्यानंतर एका चांगल्या गाडीत फिरत असणारे डॉक्टर बावस्कर यांना जन्म व त्यांचा वर्गमित्र पायी चालताना भेटतो तेव्हा त्या वर्ग मित्राला ओळखून त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद झाल्यानंतर तो वर्गमित्र त्यांना बक्षीस म्हणून त्यांच्या खिशातील पन्नास रुपयाची मळलेली नोट त्यांना देऊ करतो त्यावर त्याच मित्राची सही घेऊन ती नोट डॉक्टर बावसकर जपून ठेवतात आणि त्याला एक अमूल्य पुरस्काराची उपमा देतात एवढ्या संवेदनशील मनाचे डॉक्टर बावस्कर त्यावेळी आपल्याला दिसून पडतात. 

कोणतीही ट्रस्ट किंवा संस्था नाही.

फक्त बावस्कर शासकीय सेवा करत असताना वैयक्तिक खर्च करून विविध संशोधने त्यांनी केलेली आहेत त्यांची कुठलीही संस्था अथवा ट्रस्ट नाही हे प्रकट बावस्कर च्या भाषणात आवर्जून सांगतात. 

डॉ.क्टर बावस्कर यांचं आत्मचरित्र 'बॅरिस्टरचं कार्ट'. हायस्कूलमध्ये प्रवेश घेतांना मुख्याध्यापक यांनी त्यांच्या गरीब शेतकरी वडिलांकडे पाहून त्यांना प्रवेश देताना त्यांचा उल्लेख बॅरिस्टरचं कार्ट असा केला होता याची आठवण म्हणून डॉक्टर बावस्कर यांनी आपल्या आत्मचरित्र 'बॅरिस्टरचं कार्ट' असं नाव दिलं आहे

डॉक्टर बावस्कर यांचं आव्हान.

अनु बॉम चा वापर न करणेबाबत.

पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर भाषणाची शेवट करताना रशिया व विक्रीमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होऊ नये ही इच्छा व्यक्त करतात आणि युक्रेन व रशियामधील सुरू असलेल्या युद्धामध्ये रशिया किंवा युक्रेन हे अनु बामचा वापर करणार नाही तशी सद्बुद्धी ईश्वर त्यांना देवो ही देखील प्रार्थना करतात. 

यावरून त्यांचा मानवी जीवनाबद्दल असलेला सकारात्मक दृष्टिकोन मानवाच्या कल्याणाचा आपण काय करू शकतो ते शक्य तेवढे करण्याची वृत्ती आपल्याला डॉक्टर बावस्कर यांच्यामध्ये दिसून येते. 

डॉक्टर बावस्कर  यांच्या दृष्टीकोनातून ज्ञानाचं महत्त्व.

डॉक्टर बावसकर यांच्या मते ज्ञान ही मानवाची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि या ज्ञानामुळेच एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊन अनेक रुग्णांची सेवा करू शकला आणि इतर डॉक्टरांना देखील रुग्णसेवेत मदत करू शकला ही ते समोरील जनसमुदायास सांगण्यास विसरले नाही. 

डॉक्टर बावसकर यांचे कडून  शिकण्यासारखे काही.

परिस्थिती कशीही असली तरी तिला तोंड देऊन मार्ग काढण्याची वृत्ती ही डॉक्टर बावस्कर कडून सर्व स्तरातील लोकांना शिकण्यासारखी आहे. 

पैसा प्रसिद्धी संपत्ती ह्या सर्व गोष्टी तात्पुरत्या असून अकॅडमिक नॉलेज अकॅडमिक प्रॉपर्टी टिकणारी आहे हे देखील आपल्याला डॉक्टर बावस्कर यांच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. 

फक्त एखादी शासकीय नोकरी मिळवून आपले कुटुंब आणि आपण या मध्ये गुंतून न बसता त्या शासकीय सेवेतून सर्व स्तरातील मानवजातीला कशाप्रकारे आपण उपयोगी ठरू त्यासाठी कार्यरत राहणे ही वृत्ती देखील दखल बावस्कर यांच्या कडून शिकण्यासारखी आहे. 

तुमची परिस्थिती आज कशीही असली तरी तुमची आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि परिस्थिती बदलण्यासाठी निरंतर प्रयत्नरत राहण्याची वृत्ती देखील आपण डॉक्टर बावस्कर यांच्याकडून शिकावे. 

संशोधन करण्यासाठी मोठमोठ्या प्रयोग शाळांची आवश्यकता नसून प्रत्यक्ष माणसांची निरीक्षण जनसेवा करताना येणारे विविध समस्या समजून घेऊन त्यावर चिकित्सा पूर्वक शोधलेले उपाय मानवी जीवनासाठी कशी उपयोगी ठरतात हे आपल्याला डॉक्टर बावस्कर यांच्या उदाहरणात लक्षात येते. 


अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या पद्मश्री डॉक्टर बावस्कर यांना मिळालेला 2000 22 या वर्षाचा पद्मश्री हा खऱ्या कर्मयोगी व्यक्तीला मिळालेला योग्य सन्मान आहे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना ईश्वर दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो या प्रार्थनेसह. . . 


धन्यवाद!! 

आपलाच

प्रदीप गणपतराव जाधव. . 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.