राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standard Authority-SSSA) स्थापन करणेबाबत. शासन आदेश

 राज्य शाळा मानक प्राधिकरण

 (State School  Standard Authority-SSSA)

 स्थापन करणेबाबत. शासन आदेश


चांगली शाळा कशी असावी याचे निकष ठरविण्यासाठी शासनाने एक समिती गठीत केली आहे व त्या समितीचे घटना संदर्भात एक आदेश आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्य राज्यस्तरावर शाळा मानक प्राधिकरण State School Standard Authority -SSSA ही यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे या बाबीसाठी केंद्र शासनाने स्टार्स प्रकल्पांतर्गत तरतूद मंजूर केली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्या विषयक मानके निर्धारित करण्याची कार्यवाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे. 

राज्य शाळा मानक प्राधिकरण अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी सदर यंत्रणेची प्रशासकीय रचना शाळा मानांकन करण्यासाठी निश्चिती, प्राधिकरणाच्या काड्या चा तपशील मानांकन करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणे सदर प्राधिकरणावर येणारा आवर्ती खर्च इत्यादी तपशील निश्चित होण्याची आवश्यकता असल्यामुळे यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पुणे यांनी शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्यासोबत अशा प्रकारची टूल विकसित केले आहे. जिल्हा परिषद पुणे यांचा या संदर्भातील अनुभव व विद्या विषयक मानके निर्धारित करण्याचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी करावयाची कार्यवाही यांचा विचार करता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्यासाठी आजच्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे.



सदर समितीचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे तर सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा प्रतिनिधी, शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांचा प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ तर सदस्य सचिव म्हणून समग्र शिक्षा चा प्रतिनिधी हे असणार आहे. सदर समिती पाच सदस्यीय आहे..


सदर शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.